जयंतीबार्शीमहाराष्ट्रसामाजिक

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त बार्शीत समाजोपयोगी उपक्रम; बौद्ध विहाराला 6 सीलिंग फॅनची भेट

B1न्यूज मराठी नेटवर्क5000

बार्शी : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त भीम नगर येथील बौद्ध विहार येथे समाजोपयोगी उपक्रम उत्साहात पार पडला. या प्रसंगी भीम टायगर मागासवर्गीय बहुउद्देशीय सामाजिक संस्था, आर.पी.आय. (आठवले) तसेच बहुजन हिताय मागासवर्गीय बहुउद्देशीय सामाजिक संस्था, बार्शी यांच्या वतीने बौद्ध विहाराला 6 सीलिंग फॅन भेट देण्यात आले.500कार्यक्रमावेळी भीम टायगर मागासवर्गीय बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे संस्थापक शंकर दादा वाघमारे, आर.पी.आय. (आठवले) गटाचे शहराध्यक्ष ॲड. अविनाश (तात्या) गायकवाड, बहुजन हिताय मागासवर्गीय बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे संस्थापक ॲड. प्रसन्नजीत नाईकनवरे, नॅशनल दलित मुव्हमेंट फॉर जस्टिसचे तालुका अध्यक्ष सनी गायकवाड यांच्यासह दीपक काकडे, मक्रोज बोकेफोडे, अशोक (आण्णा) बोकेफोडे, दीपक पांडुरंग बोकेफोडे, राजेंद्र कदम, दयावान लकेश्वर, ॲड. धीरज कांबळे, अभिषेक अय्यर, वैभव काकडे, निलेश वाघमारे, भालचंद्र राजगुरू सर, कपिल बोकेफोडे आदी मान्यवर उपस्थित होते.50000यावेळी बोलताना शंकर दादा वाघमारे यांनी सांगितले की, बार्शीतील कोणत्याही बौद्ध विहारास काहीही गरज भासल्यास त्यांनी आमच्या तिन्ही संघटनांशी संपर्क साधावा. तसेच पुढील उपक्रम म्हणून भीम नगर येथील बौद्ध विहाराच्या पहिल्या मजल्यावर मोफत अभ्यासिका सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली.

या उपक्रमामुळे बौद्ध विहारातील नागरिकांना उष्णतेपासून दिलासा मिळणार असून, उपस्थितांनी संस्थांच्या सामाजिक बांधिलकीचे कौतुक केले. दीपक पांडुरंग बोकेफोडे यांनी संस्थांच्या कार्याचे विशेष कौतुक व्यक्त केले. तसेच भविष्यातही अशाच समाजोपयोगी उपक्रम राबवण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला.500

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button