पुरस्कारबार्शीमहाराष्ट्र

कुर्डूवाडीत अ‍ॅड. अमोल अलाट यांना ‘आदर्श विधीरत्न’ पुरस्कार प्रदान

जोशाबा बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचा उपक्रम; मान्यवरांच्या उपस्थितीत सोहळा संपन्न!

B1न्यूज मराठी नेटवर्क5000

​बार्शी : जोशाबा बहुउद्देशीय सामाजिक संस्था, चिंचोली व बहुजन समाज परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘जोशाबा पुरस्कार वितरण सोहळा २०२६’ उत्साहात पार पडला. या सोहळ्यात विधी क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल अ‍ॅड. अमोल अलाट यांना जिल्हास्तरीय ‘आदर्श विधीरत्न पुरस्कार २०२६’ देऊन गौरवण्यात आले. ​ह.भ.प. डॉ. जयंत करंदीकर महाराज यांच्या शुभहस्ते आणि मान्यवरांच्या उपस्थितीत हा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.5000​कै. विठ्ठलराव शिंदे सभागृह, पंचायत समिती कुर्डूवाडी येथे झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ह.भ.प. डॉ. जयंत करंदीकर महाराज होते. यावेळी संजयदादा टोणपे (सभापती, शिक्षण समिती, कुर्डूवाडी नगरपरिषद), ​बाळासाहेब देवकुळे (संस्थापक/अध्यक्ष, जोशाबा संस्था), ​ दिलीप देवकुळे (दलित स्वयंसेवक संघ, महाराष्ट्र राज्य) ​यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.50000अ‍ॅड. अमोल अलाट यांनी वकिली व्यवसायात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या याच सामाजिक बांधिलकीची आणि न्यायदानातील योगदानाची दखल घेऊन जोशाबा संस्थेच्या वतीने त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. ​”हा पुरस्कार म्हणजे माझ्या कामाला मिळालेली पावती असून, भविष्यात अधिक जोमाने सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्यासाठी मी प्रयत्नशील राहीन.” अशी भावना अ‍ॅड. अमोल अलाट यांनी व्यक्त केली.5000

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button