पुरस्कारबार्शीमहाराष्ट्रशैक्षणिक

सुयश विद्यालय, बार्शी येथे नर्सरी, ज्युनिअर के.जी. आणि सीनियर के.जी.च्या लहानग्या विद्यार्थ्यांचा “द बेस्ट स्टुडंट ऑफ द इयर” पुरस्काराने सन्मान

B1न्यूज मराठी नेटवर्क50000

बार्शी : विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. या निवड प्रक्रियेसाठी विद्यार्थ्यांची विविध निकषांवर कसून चाचणी घेण्यात आली. उत्कृष्ट वाचन कौशल्य, गोष्टी सांगण्याची क्षमता, स्टोरी नंबर, रीडिंग स्किल्स, वैयक्तिक स्वच्छता तसेच शालेय उपस्थिती या सर्व बाबींचा सखोल आढावा घेऊन विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करण्यात आले. या सर्व क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांची “स्टुडंट ऑफ द इयर” म्हणून निवड करण्यात आली.5000निवड झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान संस्थेचे संस्थापक आदरणीय नलवडे साहेब यांच्या हस्ते मेडल देऊन करण्यात आला. या प्रसंगी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि पालकांचा अभिमान पाहण्यासारखा होता.5000कार्यक्रमाला प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ. अलका जगताप मॅडम उपमुख्याध्यापक श्री येवले सर संबंधित वर्गांना शिकवणाऱ्या सर्व शिक्षिका तसेच विद्यार्थ्यांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करत त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.5000या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धात्मकता, आत्मविश्वास आणि चांगल्या सवयींची जडणघडण होण्यास मोठी मदत होत असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले. सुयश विद्यालयाचा हा स्तुत्य उपक्रम विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी नक्कीच प्रेरणादायी ठरत आहे.5000

50000

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button