२७ मार्च रोजी पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा
B1न्यूज मराठी नेटवर्क
सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील नोकरी इच्छुक उमेदवारांसाठी शुक्रवार, दि. २७ मार्च २०२६ रोजी पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र सोलापूर यांच्या विद्यमाने आयोजित या मेळाव्यात जिल्ह्यातील उमेदवारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचा उद्देश आहे.
या रोजगार मेळाव्यात १० वी, १२ वी, आयटीआय (वेल्डर, फिटर), डिप्लोमा, ग्रॅज्युएट, ऑफिस असिस्टंट, कोणतीही पदवी, इलेक्ट्रिशियन, मशिन ऑपरेटर, बी.कॉम, एम.कॉम अशा विविध शैक्षणिक पात्रतेनुसार एकूण १४५ पेक्षा जास्त रिक्तपदे उपलब्ध असून, ती ८ उद्योजकांनी ऑनलाईन अधिसूचित केली आहेत.
नोकरी इच्छुक उमेदवारांनी आपला रिझ्युमेच्या तीन प्रती व आवश्यक कागदपत्रांसह शुक्रवार, दि. २७ मार्च रोजी सकाळी ११ ते दुपारी १ वाजेपर्यंत जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, नॉर्थ कोट पार्क चौक, सोलापूर येथे मुलाखतीसाठी उपस्थित राहावे.
अधिक माहितीसाठी कार्यालयीन वेळेत ०२१७-२९९२९५६ या दूरध्वनीवर अथवा प्रत्यक्ष भेटीद्वारे मार्गदर्शन केंद्राशी संपर्क साधावा. तसेच उमेदवारांनी https://rojgar.mahaswayam.gov.in या वेबपोर्टलला भेट देऊन अधिक माहिती मिळवावी, असे सहाय्यक आयुक्त कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता संगीता खंदारे यांनी सांगितले.





