धार्मिकबार्शीमहाराष्ट्रयात्रा

​१३०० वर्षांची परंपरा! भाताली (लोहारा) येथील ‘मोठ्या महादेवाची कावड’ मालवंडीत; भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी

B1न्यूज मराठी नेटवर्क50000

बार्शी : धाराशिव जिल्ह्यातील लोहारा तालुक्यातील भाताली येथील ऐतिहासिक आणि श्रद्धेचे प्रतीक असलेल्या ‘मोठ्या महादेवाची कावड’ शिखर शिंगणापूरच्या यात्रेसाठी मार्गस्थ झाली आहे. सोलापूर जिल्ह्यातील मालवंडी (ता. बार्शी) येथे या कावडीचे आगमन झाले असता, ग्रामस्थांनी आणि भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. ‘हर हर महादेव’च्या जयघोषाने संपूर्ण परिसर भक्तिमय झाला होता.5000पिढ्यानपिढ्या चालत आलेली भक्तीची वारी
​भाताली येथील हनुमंत काशीनाथ जगताप यांनी या कावडीच्या परंपरेबद्दल माहिती देताना सांगितले की, ही परंपरा गेल्या १३०० वर्षांपासून अविरतपणे सुरू आहे. धाराशिव जिल्ह्यातील लोहारा तालुक्यातून निघालेली ही कावड वाटेत येणाऱ्या प्रत्येक गावाला सुख-समृद्धीचा आशीर्वाद देत शिखर शिंगणापूरकडे प्रस्थान करते. काल ही कावड भातालीहून मालवंडी येथे दाखल झाली.
5000​नवसाला पावणारी कावड : भाविकांची दृढ श्रद्धा या कावडीचे वैशिष्ट्य म्हणजे ही ‘नवसाला पावणारी कावड’ म्हणून ओळखली जाते. ज्या भाविकांना अपत्यप्राप्ती किंवा इतर कौटुंबिक अडचणी आहेत, ते या कावडीसमोर श्रद्धेने नतमस्तक होतात. नवस पूर्ण झाल्यानंतर भाविक मोठ्या संख्येने दर्शनासाठी येतात, असे जगताप यांनी नमूद केले. मालवंडीमध्ये कावडीचे स्वागत करताना अबालवृद्धांनी दर्शनासाठी गर्दी केली होती.5000भक्तीचा जल्लोष आणि जयघोष गुलाबी आणि पिवळ्या रंगाचे फेटे परिधान केलेले शेकडो भाविक, हातामध्ये असलेल्या भगव्या पताका आणि ढोल-ताशांच्या गजरामुळे मालवंडीत जणू जत्रेचे स्वरूप आले होते.5000

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button