बार्शीत रंगणार ‘श्री भगवंत महोत्सव २०२६’ चा भव्य सोहळा; ९ दिवस सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी!
B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : बार्शी नगरपरिषद, श्री भगवंत देवस्थान, कृषी उत्पन्न बाजार समिती, बार्शी पंचायत समिती व श्री भगवंत बहुउद्देशीय संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘श्री भगवंत महोत्सव २०२६’ चा भव्य कार्यक्रम २० एप्रिल ते २८ एप्रिल या कालावधीत बार्शीतील श्री भगवंत मैदान येथे संपन्न होणार आहे. या महोत्सवात विविध सांकृतिक, धार्मिक आणि मनोरंजनात्मक कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे.
महोत्सवाचे प्रमुख आकर्षण आणि कार्यक्रम:
२० एप्रिल: भव्य राज्यस्तरीय सोंगी भारूड स्पर्धा (यशवंतराव चव्हाण सभागृह).
२१ एप्रिल: क्रांती (नाना) मळेगावकर यांचा महिलांचा आवडता कार्यक्रम ‘होम मिनिस्टर’ (खेळ पैठणीचा).
२२ एप्रिल: संगीत क्षेत्रातील सर्वोच्च कलाविष्कार ‘The Folk आख्यान’.
२३ एप्रिल: प्रचंड विनोदी नाटक ‘ऑल द बेस्ट’.
२४ एप्रिल: सायंकाळी ६ वाजता ह.भ.प. शिवलीला पाटील यांचे सुश्राव्य कीर्तन, त्यानंतर आनंद शिंदे आणि पार्टी यांची संगीत मैफल.
२५ एप्रिल: सुदेश भोसले आणि बेला सुलाखे यांचा ‘सुरीला सिलसिला’ हा ऑर्केस्ट्रा कार्यक्रम.
२६ एप्रिल: बार्शीकर स्थानिक कलावंतांचा नृत्य, गायन आणि संगीताचा रंगारंग कार्यक्रम.
२७ एप्रिल: १०० हून अधिक कलाकारांचा सहभाग असलेले ऐतिहासिक महानाट्य ‘शिवायन’.
२८ एप्रिल: श्री भगवंत प्रकटोत्सव विशेष
महोत्सवाच्या शेवटच्या दिवशी म्हणजे २८ एप्रिल रोजी पहाटे ४:३० वाजता श्री भगवंत मंदिरात अभिषेक, सकाळी ८:०० वाजता शहरातून भव्य दिंडी व शोभायात्रा काढण्यात येईल. दुपारी १२ ते ३ या वेळेत महाप्रसादाचे आयोजन मॉडेल हायस्कूल येथे करण्यात आले आहे. रात्री ७:०० वाजता गुरुवर्य डॉ. जयवंत महाराज बोधले यांचे कीर्तन आणि त्यानंतर भव्य आतषबाजीने महोत्सवाची सांगता होईल.
या सर्व कार्यक्रमांसाठी महिलांची स्वतंत्र बैठक व्यवस्था करण्यात आली असून, सर्व कार्यक्रम वेळेवर सुरू होतील. बार्शी व परिसरातील नागरिकांनी या महोत्सवाचा मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.





