नागपूरनिवडमहाराष्ट्र

विदर्भ साहित्य संघाचे नवनिर्वाचित अध्यक्ष डॉ. गिरीष गांधी यांचे विभागीय माहिती संचालक कार्यालयाकडून अभिनंदन

B1न्यूज मराठी नेटवर्क5000

नागपूर : विदर्भ साहित्य संघाचे नवनिर्वाचित अध्यक्ष डॉ. गिरीष गांधी यांचे आज माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे नागपूर विभागीय माहिती संचालक डॉ. गणेश मुळे यांनी अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. नुकतीच विदर्भ साहित्य संघाच्या अध्यक्षपदासाठी निवडणूक घेण्यात आली व या निवडणुकीत डॉ. गिरीष गांधी हे बहुमताने निवडून आले. या पार्श्वभूमीवर डॉ. गणेश मुळे यांनी त्यांच्या रवीनगर भागातील कार्यालयात भेट घेतली व पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन केले. 50000
यावेळी झालेल्या अनौपचारिक चर्चे दरम्यान डॉ. गांधी यांनी विदर्भ साहित्य संघाच्या पुढील वाटचाली विषयीची योजना सांगितली. डॉ. मुळे यांनी साहित्य संघाच्या आगामी कार्यक्रमात पत्रकारांसाठीही विशेष कार्यक्रम घ्यावेत असे यावेळी सूचविले. माहिती अधिकारी रितेश भुयार, मुख्यमंत्री कार्यालयाचे प्रसिद्धी समन्वयक अविनाश महालक्ष्मे यावेळी उपस्थित होते. त्यांनीही डॉ. गांधी यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.
5000

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button