शिखर शिंगणापूर येथे गुरुवारपासून चैत्र यात्रा सोहळा रंगणार

0

B1न्यूज मराठी नेटवर्क50000

नातेपुते : शंभू महादेवाच्या श्री क्षेत्र शिखर शिंगणापूर येथे ‘चैत्र यात्रा सोहळा २०२६’ उत्साहात साजरा होणार आहे. गुरुवार, १९ मार्च २०२६ (गुढीपाडवा) पासून या सोहळ्याला सुरुवात होणार आहे. २ एप्रिल २०२६ रोजी हनुमान जन्मोत्सवाने यात्रेची सांगता होईल. या १५ दिवसांच्या कालावधीत विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.5000१९ मार्च (गुढीपाडवा): चैत्र मास प्रारंभ, गुढी उभारणे आणि लग्नाची मुहूर्तमेढ रोवून उत्सवाची सुरुवात होईल. २३ मार्च (सोमवार): श्री शिव-पार्वती हळदी सोहळा (देवाची हळद) संपन्न होईल. २६ मार्च (गुरुवार): दुपारी ४ ते ६ दरम्यान मंदिराच्या कळसाला ध्वज (पागोटे) बांधले जातील. याच दिवशी रात्री १२ वाजता श्री शिव-पार्वती विवाह सोहळा आणि श्री रामनवमी साजरी होईल. 5000२९ मार्च (रविवार): चैत्र मोठी एकादशीनिमित्त घोड्यावरून ‘इंदूरच्या राजांची स्वारी’ निघेल. ३० मार्च (सोमवार): मुंगी घाट कावड सोहळा, जलाभिषेक धार आणि सोमप्रदोष पूजा होईल. २ एप्रिल (गुरुवार): हनुमान जन्मोत्सव, प्रक्षाळ पूजा आणि यात्रेची सांगता.5000

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या