क्राईमप्रशासनबार्शीमहाराष्ट्र

विनापरवाना डिझेल विक्रीचा पर्दाफाश पांगरी येथे टँकरसह वाहन चालकाविरुद्ध गुन्हा

B1न्यूज मराठी नेटवर्क50000

​बार्शी : येडशी-बार्शी रोडवरील पांगरी येथे विनापरवाना डिझेलची वाहतूक आणि विक्री करणाऱ्या एका महिंद्रा पिकअप टँकरवर महसूल विभागाने मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत ४६० लिटर डिझेल जप्त करण्यात आले असून, वाहन चालकाविरुद्ध पांगरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
​
​सध्या जागतिक स्तरावर सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे पेट्रोलियम पदार्थांची टंचाई भासू नये, यासाठी शासनाने अनधिकृत इंधन विक्रीवर कडक नजर ठेवण्याचे आदेश दिले आहेत. याच पार्श्वभूमीवर, बार्शीचे तहसीलदार यांनी पांगरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत विनापरवाना डिझेल विक्री होत असल्याची माहिती मिळताच तातडीने कारवाईचे आदेश दिले होते.5000दिनांक १६ मार्च २०२६ रोजी सकाळी ११:०० च्या सुमारास, गोदाम व्यवस्थापक ऋषीकेश सुभाष धनवडे आणि पुरवठा लिपीक अमित शेळवणे यांनी पांगरी येथील हॉटेल जय भवानी समोर सापळा रचला. यावेळी पांढऱ्या रंगाची महिंद्रा पिकअप (क्र. MH-25-AJ-8025) संशयास्पद रितीने उभी असल्याचे दिसून आले. तपासणी केली असता, त्यामध्ये साधारण ४१,७३१ रुपये किमतीचे ४६० लिटर डिझेल मिळून आले.5000वाहन चालक अजय भारत कसबे (रा. मोहा, ता. कळंब, जि. धाराशिव) याला डिझेल विक्रीच्या परवान्याबाबत विचारणा केली असता, त्याच्याकडे कोणताही अधिकृत परवाना नसल्याचे निष्पन्न झाले. गावोगवी जाऊन धोकादायक पद्धतीने हे डिझेल विकले जात असल्याची कबुली चालकाने दिली.50000या प्रकरणी आरोपीविरुद्ध अत्यावश्यक वस्तू व सेवा अधिनियम १९५५ चे कलम ३ व ७ तसेच भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम २८५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पांगरी पोलीस करत आहेत.5000

🟥 B1 News मराठी
मुख्य संपादक : भैरवनाथ भारत चौधरी
📞 9975417832 / 8698367482
🌐 b1newsmarathi.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button