बार्शी राष्ट्रीय महालोकअदालतीत २३७० प्रकरणे तडजोडीने निकाली, कोटी ४९ लाख २४ हजार ५८६ रुपयांची वसुली

0

B1न्यूज मराठी नेटवर्क50000

बार्शी : महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या निर्देशानुसार आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सोलापूर यांच्या मार्गदर्शनाखाली बार्शी न्यायालयात आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय महालोकअदालतीत २३७० प्रकरणे तडजोडीने निकाली काढण्यात आली असून एकूण ३ कोटी ४९ लाख २४ हजार ५८६ रुपयांची वसुली करण्यात आली.

ही लोकअदालत तालुका विधी सेवा समिती, बार्शी आणि बार्शी वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आली होती. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान जिल्हा न्यायाधीश-१ तथा तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष विक्रमादित्य के. मांडे यांनी भूषविले. या उपक्रमासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष एम. एस. शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच सचिव पी. पी. पेटकर यांच्या सहकार्याने आयोजन करण्यात आले.50000या लोकअदालतीत बार्शी न्यायालयातील ४०४० प्रलंबित दिवाणी व तडजोडपात्र फौजदारी प्रकरणे तसेच ७१२४ दाखलपूर्व प्रकरणे अशा एकूण ११,१६४ प्रकरणांचा विचार करण्यात आला. त्यापैकी २३७० प्रकरणे परस्पर समझोत्याने निकाली काढण्यात यश आले. प्रलंबित प्रकरणांतून १ कोटी ६४ लाख ९२ हजार ५६४ रुपये, तर दाखलपूर्व प्रकरणांतून १ कोटी ८४ लाख ३२ हजार २२ रुपये इतकी रक्कम वसूल करण्यात आली.50000या लोकअदालतीसाठी बार्शी न्यायालयात पाच स्वतंत्र पॅनल कार्यरत होती. विविध न्यायालयांतील न्यायाधीशांनी प्रकरणांमध्ये मध्यस्थी करून अनेक वाद तडजोडीने मिटविण्यात पुढाकार घेतला. काही प्रकरणांमध्ये पक्षकारांची अडचण लक्षात घेऊन न्यायाधीशांनी स्वतः दालनाबाहेर जाऊन तडजोड प्रक्रिया पूर्ण केल्याची नोंद घेण्यासारखी बाब ठरली.

मोटार अपघाताशी संबंधित एका प्रकरणात १७ लाख २५ हजार रुपयांची नुकसानभरपाई मंजूर करण्यात आली. तसेच एन.आय. अॅक्ट १३८ अंतर्गत १८ प्रकरणे तडजोडीने निकाली निघाली असून त्यातून ३ लाख ६८ हजार ३५४ रुपये वसूल झाले. रक्कम वसुलीच्या १२ प्रकरणांतून १ कोटी १५ लाख ८ हजार २२७ रुपये वसुली करण्यात आली.50000तसेच तडजोडपात्र फौजदारी प्रकरणांपैकी ५ प्रकरणे व कबुलीच्या ९४ प्रकरणांचा निकाल लागून १ लाख ३३ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. राष्ट्रीय महालोकअदालतीला बार्शी वकील संघाचे अध्यक्ष रणजित गुंड, पॅनल विधिज्ञ, न्यायालयीन कर्मचारी, पोलीस कर्मचारी, बँका, फायनान्स कंपन्या, पंचायत समिती बार्शी तसेच महावितरणचे प्रतिनिधी यांचे विशेष सहकार्य लाभले. या उपक्रमाला पक्षकारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याने अनेक प्रकरणांचा जलद निपटारा होऊ शकला.50000

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या