२४ मार्चला नागपूर येथे विभागीय हातमाग कापड स्पर्धा वस्त्रोद्योग प्रादेशिक उपआयुक्त कार्यालयात होणार स्पर्धा

0

B1न्यूज मराठी नेटवर्क50000

अमरावती, दि. १३ : हातमाग विणकरांनी विणलेल्या उत्कृष्ठ हातमाग कापड नमून्यांना प्रोत्साहन देण्यासाठी २४ मार्च रोजी नागपूर येथे विभागीय हातमाग कापड स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. अमरावती व नागपूर विभागांतर्गत असलेल्या जिल्ह्यांतील हातमाग विणकरांनी या स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभाग घ्यावा, असे आवाहन प्रादेशिक उपआयुक्त, (वस्त्रोद्योग) अंजू बालपांडे यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे केले आहे.

या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी हातमाग विणकरांनी तयार केलेले कापड नमूने दि. २० मार्च रोजी, सायं ५ वाजेपर्यंत नागपूरच्या प्रादेशिक उपआयुक्त (वस्त्रोद्योग) कार्यालयात जमा करणे आवश्यक आहे.50000यानुसार विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांच्या अध्यक्षतेखाली या हातमाग कापड स्पर्धेचे आयोजन २४ मार्च २०२६ रोजी दुपारी ३.३० ला प्रादेशिक उपआयुक्त, (वस्त्रोद्योग) कार्यालय, नवीन प्रशासकीय इमारत क्र. २, आठवा माळा, ‘बी’ विंग, सिव्हिल लाईन्स, नागपूर येथे होणार आहे. विदर्भातील सर्व हातमाग कापड विणकरांनी याची नोंद घ्यावी.

अधिक माहितीसाठी प्रादेशिक उपआयुक्त, वस्त्रोद्योग, नागपूर कार्यालयाशी ०७१२-२५३७९२७ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन विभागाद्वारे करण्यात आले आहे.50000

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या