​बार्शीच्या ‘हास्यरंग’ मध्ये डॉ. राहुल पालके यांच्या ‘दवाखान्यातील विनोदांनी’ रसिक झाले लोटपोट!

0

B1न्यूज मराठी नेटवर्क50000

बार्शी : महाराष्ट्र साहित्य परिषद, शाखा बार्शी तर्फे आयोजित ‘हास्यरंग’ या विशेष कार्यक्रमात डॉ. राहुल पालके यांनी आपल्या सादरीकरणातून हास्याचे कारंजे उडवले. ‘दवाखान्यातील विनोद’ या आपल्या विशेष भागातून त्यांनी डॉक्टर आणि रुग्ण यांच्यातील अतरंगी संवादांचे असे काही दर्शन घडवले की, उपस्थित रसिक हसून हसून लोटपोट झाले.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बाबासाहेब कथले होते. प्रमुख पाहुणे म्हणून साबळे सर उपस्थित होते. मसाप शाखा बार्शीचे अध्यक्ष पां. नि. निपाणीकर यांनी विनोद व कविता सादरीकरणातून कवी विश्वासंबंधी हास्याचे कारंजे उडविले. महाराष्ट्र साहित्य परिषद आणि ‘कथले ज्वेलर्स’ यांच्या सौजन्याने झालेल्या या उपक्रमात डॉ. पालके यांनी वैद्यकीय क्षेत्रातील गंभीर वातावरणातही विनोदाची पेरणी कशी करता येते याचे उत्तम उदाहरण सादर केले.50000सार्वजनिक वाचनालयाच्या सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात डॉ. पालके यांनी एकामागून एक सरस विनोद सादर केले. “गोळी लिहून देतो” असं म्हणणाऱ्या डॉक्टरांना पेशंटने “गोळी लागल्यामुळेच इथे आलोय” असे उत्तर देताच सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला. पावसाच्या वातावरणावर उपाय विचारणाऱ्या पेशंटला डॉक्टरांनी “चार माणसे जमू द्या” असे सांगताच पेशंटसोबतच प्रेक्षकही चक्रावून गेले.

ग्रामीण आणि शहरी संवादाची मेजवानी मुंबईला आलेल्या पेशंटचा ‘बेस्ट’ आणि ‘वर्स्ट’ बसचा गोंधळ असो किंवा ‘लायन्स हॉस्पिटल’ शोधणारा पेशंट स्वतःला ‘लायन्सचा मालक’ म्हणवून घेतो, तेव्हा डॉ. पालके यांच्या संवादफेकीने कार्यक्रमात रंगत आणली. विशेषतः लहान बाळाने इंजेक्शन देणाऱ्या डॉक्टरांना बघून “काका, मला वाचवा” म्हणत मारलेली हाक आणि ‘डोक्याच्या बॅटरीचा सेल मिळत नाही’ हा पेशंटचा टोला, या विनोदांनी कार्यक्रमाची उंची वाढवली.

कार्यक्रमाच्या शेवटी, “दवाखान्यात रुग्णांवर उपचार होतात आणि तिथेच रिझल्ट्स मिळतात” या डॉ. पालके यांच्या वाक्यावर रसिकांनी उभे राहून दाद दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विभुते सरांनी तर आभार कांदे सरांनी मानले.​या प्रसंगी महाराष्ट्र साहित्य परिषद बार्शी शाखेचे पदाधिकारी, साहित्यिक आणि मोठ्या संख्येने रसिक नागरिक उपस्थित होते. अशा उपक्रमांमुळे बार्शीतील सांस्कृतिक आणि साहित्यिक चळवळीला मोठी उभारी मिळत असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.5000

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या