महाराजस्व अभियान- कोंडी मंडळछत्रपती शिवाजी महाराज महा राजस्व अभियानाअंतर्गत कोंडी मंडळातील नागरिकांना विविध दाखल्यांचे वाटप

0

B1न्यूज मराठी नेटवर्क50000

सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराज महा राजस्व अभियानाअंतर्गत कोंडी मंडळात समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात नागरिकांना विविध दाखले, प्रमाणपत्रे व शासकीय योजनांचा लाभ एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आला. शिबिरास आमदार विजयकुमार देशमुख, प्रांताधिकारी सदाशिव पडदुणे, तहसीलदार निलेश पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवून या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

शिबिरातील ठळक उपक्रम

निकाली काढलेले फेरफरांची संख्या – 61

सातबारा वरील दुरुस्ती संदर्भात स्वीकारण्यात आलेल्या अर्जाची संख्या -05

अभियानांतर्गत नागरिकांना देण्यात आलेल्या सातबारा ची संख्या -310

नागरिकांना वाटप करण्यात आलेल्या 8 अ ची संख्या -15

नागरिकांना वितरित करण्यात आलेल्या प्रमाणपत्राची संख्या – 210

एक खिडकी अंतर्गत निकाली काढण्यात आलेल्या अर्जाची संख्या- 15

आरोग्य तपासणी केलेली नागरिकांची संख्या -72

पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेअंतर्गत कर्ज मंजुरीचे आदेश वाटप करण्यात आले लाभार्थ्यांची संख्या -18

नवीन रेशन कार्ड प्राप्त अर्ज -17

युनिट वाढ कमी करण्यासाठी प्राप्त अर्ज -18

संजय गांधी अर्ज वाटप केलेले लाभार्थी संख्या – 20

चौकशी करून उत्पन्न दाखले देण्यात आलेल्या लाभार्थ्यांची संख्या -60

गोपीनाथ मुंडे सानुग्रह अनुदान योजनेअंतर्गत लाभ वाटप लाभार्थी संख्या -01

सुरक्षित रस्ता सप्ताह 600 पुस्तके ग्रामस्थांना वाटप..

पासेस वाटप करण्यात आलेल्या घरकुल लाभार्थी संख्या – 38

बेबी केअर किट वाटप लाभार्थ्यांची संख्या -05500000या शिबिरामुळे नागरिकांना त्यांच्या दैनंदिन गरजांशी संबंधित दाखले, प्रमाणपत्रे व योजनांचा लाभ सहज मिळाला. प्रशासनाच्या पुढाकारामुळे नागरिकांचा वेळ व श्रम वाचले तसेच शासकीय सेवा अधिक सुलभ झाल्या.

तहसील प्रशासनाने दिलेल्या या सेवांमुळे नागरिकांच्या समस्यांचे त्वरित समाधान झाले असून, आगामी काळात अशा उपक्रमांचे प्रमाण वाढवून अधिकाधिक नागरिकांना लाभ देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज महा राजस्व अभियान कोंडी तालुका उत्तर सोलापूर. यावेळी आमदार विजयकुमार देशमुख, प्रांताधिकारी सदाशिव पडदुणे, तहसीलदार निलेश पाटील यांच्यासह अन्य पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते. या शिबिरास नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.50000

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या