यावली येथे अनेक वर्षांपासून प्रलंबित यावली ढोराळे रस्त्याचे भूमिपूजन ,भाजपा युवा मोर्चा सोलापूर जिल्हा अध्यक्ष ॲड. रणवीर राऊत यांच्या शुभहस्ते संपन्न

0

B1न्यूज मराठी नेटवर्क50000

वैराग : बार्शी तालुक्यातील यावली हे गाव तालुक्याचा सीमेवरील त्यामुळे येथील यावली ते ढोराळे गावाला जोडणारा रस्ता अनेक वर्षांपासून प्रलंबित होता या रस्त्यावर भरपूर शेतकऱ्यांचे दळण वळण चालते त्यामुळे गावातील नागरिकांनी हि समस्या तत्कालीन आमदार राजेंद्र राऊत यांच्या कानावर घालून याचा पाठपुरावा केला होता, त्यास प्रतिसाद देत आमदार राऊत यांचा आमदार कार्यकाळात मंजूर करण्यात आलेल्या यावली ते ढोराळे या रस्त्यासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून सरकारच्यावतीने मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून सुमारे ७ कोटी ६० लाख रुपये मंजूर करण्यात आले होते.50000या कामाचे आज दिनांक 5 मार्च 2026 रोजी
भाजपा युवा मोर्चा सोलापूर जिल्हा अध्यक्ष ॲड.रणवीर राऊत यांच्या शुभहस्ते रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले. राऊत यांनी यावेळी बोलताना सांगितले की रस्ता मंजुरीचे काम आम्हीं केले आता तुम्ही काम व्यवस्थित करून घ्या व इथून पुढे कसलेही काम सांगा आम्हीं सेवेसाठी हजर राहू.

यावेळी वैराग चे नगरसेवक शाहूराजे निंबाळकर, नाना धायगुडे, सुर्डी चे माजी सरपंच विनायक डोईफोडे, यावली चे माजी सरपंच प्रल्हाद तुरे , उपसरपंच सचिन उकरंडे, रघुनाथ सरवदे, दत्ता हुजरे, माजी सरपंच नागनाथ काकडे, माजी उपसरपंच राजेंद्र तुरे, ग्रामपंचायत सदस्य शरद काकडे, निलेश उबाळे, आप्पा मांजरे, अमित सरवदे,अभिजीत उकरंडे, ढोराळे सरपंच अमोल शिंदे,ग्रा. पं. सदस्य राहुल खरात, तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.50000

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या