बार्शी येथील रहिवासी मयुरा तपकिरे – इनामदार यांना पीएच. डी. पदवी प्रदान
B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : येथील रहिवासी डॉ. मयुरा तपकिरे-इनामदार यांना दिनांक २५ फेब्रुवारी २०२६ रोजी पीएच.डी. पदवी प्रदान करण्यात आली. त्यांनी “Artificial Intelligence-Based Celiac Disease Prediction and Healthcare” या विषयावर संशोधन पूर्ण करून १९ एप्रिल २०२५ रोजी यशस्वीरीत्या प्रबंध सादर केला.
त्या मूळच्या बीड जिल्ह्यातील अंबेजोगाई येथील आहेत. त्यांचे दहावीपर्यंतचे शिक्षण गोदावरी कुंकुळोल कन्याशाळा, अंबेजोगाई येथे झाले असून अकरावी-बारावीचे शिक्षण योगेश्वरी सायन्स कॉलेज येथे पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी महात्मा बसवेश्वर एज्युकेशन सोसायटीच्या कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, अंबेजोगाई येथून Computer Science and Engineering मध्ये BE व ME पदवी प्राप्त केली.
पुढे त्यांनी पुणे येथील Syntel Pvt. Ltd. मध्ये Software Engineer म्हणून दोन वर्षे काम केले. त्यानंतर CFTRI, मैसूर येथे Scientist म्हणून कार्यरत असलेले डॉ. आशुतोष इनामदार यांच्याशी विवाहानंतर त्यांनी शैक्षणिक क्षेत्रात आपला प्रवास पुढे चालू ठेवला. सध्या त्या The National Institute of Engineering (NIE), Mysore येथे Computer Science and Engineering विभागात Associate Professor म्हणून मागील ११ वर्षांपासून कार्यरत आहेत. नोकरी करत असताना त्यांनी JSS Science and Technology University, Mysore येथून Part-time पद्धतीने पीएच.डी. पूर्ण केली.





