रातंजन येथे गुरुपोर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी अशोक नागटिळक महाराज यांचे हजारो भक्तानी घेतले दर्शन

B1न्यूज मराठी नेटवर्क गौतम नागटिळक
बार्शी : बार्शी तालुक्यातील रातंजन येथे जय महाकाली माता देवीच्या मंदिरात गुरुपोर्णिमा दिवशी भविकांनी मोठी गर्दी होती. अशोक नागटिळक महाराज यांचे दर्शन घेण्यासाठी महाराष्ट्रातील भाविक भक्त गुरु पोर्णिमेच्या शुभेछ्या देण्यासाठी दिवसभर गर्दी मोठी होती. दिवसभर मोठ्या उत्साहात रातंजन येथे गुरु पोर्णिमा साजरी करण्यात आली. प्रत्येक शिष्यानी लाल काला पोशाख घालून होम जपास सूरवात केली. प्रत्येक शिष्यानी गुरुला फुलाचा हार घालून श्री अशोक महाराज यांची आरती ओवाळून गुरुपोर्णिमेच्या शुभेछ्या दिल्या.
भाविकाना आलेल्या महाराष्ट्रातून सर्व भक्तांना जेवण्याची उत्तम सोय केली होती. सर्व शिष्यांनी गुरुचे दही – दुधांनी पाय धोहून पुष्पहार घालून आरती केली. अशोक महाराज यांचे हजारो भक्त भविकांनी दर्शन घेतले. सोशल मिडिया आणि फोन वरुण गुरुपोर्णिमेच्या शुभेछ्या दिल्या.
शिष्य आणि गुरु महत्व या कार्यक्रमातून दिसून आले. अतिशय सुंदर कार्यक्रम आनंदमय वातावरणात उत्साहात गुरुपोर्णिमा साजरी झाली.
गुरुपोर्णिमेचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आप्पासाहेब नागटिळक , विष्णु शिंदे, बापू नागटिळक, रणजीत जाधव , किरण डोलारे, महेश जाधव, आप्पा हिवरे , निलेश गिराम , आप्पा स्वामी बिरु नागटिळक, विक्रांत चव्हाण, इतर लोकांनी सहकार्य केले. कार्यक्रमाच्या शेवट महाकाली देवीची आरती करण्यात आली.