लोखंडी स्टीलच्या कड्याने गंभीर मारहाण केल्याचा आरोप असलेल्या आरोपीचा जामीन मंजूर

0

B1न्यूज मराठी नेटवर्क500000

बार्शी : बार्शी शहर पोलिस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर ६४/२०२६ नुसार फिर्यादी सूरज मोहन साळुंखे वय-३५ वर्षे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी जय जगन्नाथ गायकवाड, स्वप्निल संतोष भालशंकर याच्यावर बीएनएस कलम-११८(२),३(५),३५२ प्रमाणे गुन्हा दाखल होता. अधिक माहिती अशी की फिर्यादी दि.१० फेब्रुवारी २०२६ रोजी रात्री ९ वाजता तानाजी चौकातील लिनिशा बिअर बार येथे दारु पिण्यासाठी गेले असता फिर्यादीच्या ओळखीचे जय जगन्नाथ गायकवाड,अमित शिंदे व स्वप्निल संतोष भालशंकर हे तेथे जोरजोराने गोंधळ करीत असल्याने, फिर्यादीने गोंधळ करू नका असे म्हणून बिल देण्यासाठी गेले असता जय जगन्नाथ गायकवाड याने फिर्यादीच्या डोक्यात स्टीलच्या कड्याने मारून गंभीर जखमी केले व लिनिशा बिअर बारच्या पार्किंगमध्ये ओढत नेउन जय गायकवाड, अमित शिंदे व स्वप्निल भालशंकर यांनी लाथा बुक्क्यांनी गंभीर मारहाण केल्याची तक्रार बार्शी शहर पोलिस स्टेशन येथे दाखल केली होती.5000सदर गुह्यातील जय गायकवाड व स्वप्निल भालशंकर या संशयित आरोपीच्यावतीने बार्शी येथील मा. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी साहेब यांच्या न्यायालयात अ‍ॅड. विवेक गजशिव यांनी जामीन अर्ज दाखल केला होता. यावेळी अरोपींच्या वकिलांचा युक्तिवाद ग्राह्य धरत मा. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी श्रीमती जी. एस. पाटील साहेब यांनी वर नमूद आरोपींचा जामीन अर्ज मंजूर केला. यावेळी आरोपींच्यावतीने अ‍ॅड. विवेक गजशिव, अ‍ॅड. श्रीराम काशीद, अ‍ॅड. विजय गलांडे यांनी काम पाहिले.5000

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या