बार्शीमहाराष्ट्र

बार्शी बसस्थानकाच्या सुसज्ज, आधुनिक इमारतीचे स्वप्न अंतिम टप्प्यात

B1न्यूज मराठी नेटवर्क50000

बार्शी : बार्शीकरांना अनेक वर्षांपासून प्रतीक्षा असलेले सुसज्ज, भव्य आणि आधुनिक बसस्थानक लवकरच प्रत्यक्षात उतरणार असल्याची आनंदाची बातमी समोर आली आहे. माजी आमदार राजाभाऊ राऊत यांच्या आमदारकीच्या कार्यकाळात बार्शी बसस्थानकाच्या नव्या इमारतीसाठी सातत्याने पाठपुरावा करण्यात आला होता. महायुती सरकारच्या माध्यमातून या कामास मंजुरी देण्यात आली होती.

बार्शीमध्ये आधुनिक सुविधांनी युक्त, प्रशस्त आणि आकर्षक बसस्थानक उभारण्याचे स्वप्न केवळ बार्शीकरांचेच नव्हे, तर स्वतः माजी आमदार राजाभाऊ राऊत यांचेही होते. हे स्वप्न आता अंतिम टप्प्यात पोहोचल्याची भावना त्यांनी व्यक्त केली असून, याबाबत त्यांनी मनस्वी आनंद व्यक्त केला आहे.5000दरम्यान, बसस्थानकाच्या बांधकामास अंतरिम मंजुरी मिळाल्यानंतर महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ यांनी बार्शी बसस्थानकाचे आर्किटेक्चरल आणि इन्फ्रास्ट्रक्चरल 3D डिझाइन प्रकाशित केले आहे. नव्या डिझाइनमध्ये प्रवाशांसाठी अत्याधुनिक सुविधा, प्रशस्त प्रतीक्षागृह, सुबक तिकीट काऊंटर, स्वच्छतागृहे तसेच इतर आवश्यक सोयींचा समावेश करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे.
लवकरच या प्रकल्पासाठी वर्क ऑर्डर काढण्यात येणार असून, बार्शीच्या वैभवात भर घालणारी ही भव्य इमारत दिमाखात उभी राहणार आहे.
या महत्त्वपूर्ण प्रकल्पासाठी महायुती सरकारचे बार्शीकरांकडून मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात येत आहेत.
50000

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button