बार्शीकरांसाठी खुशखबर: माधवबाग तर्फे अवघ्या ७९९ रुपयांत हृदय आरोग्य तपासणी शिबिर!
B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : वाढते धावपळीचे आयुष्य आणि चुकीच्या जीवनशैलीमुळे हृदयविकाराचा धोका दिवसेंदिवस वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर, ‘हृदयाला जपूया, ठणठणीत ठेवूया’ असा संकल्प करून माधवबाग क्लिनिक, बार्शी यांच्या वतीने एका विशेष आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
काय आहे विशेष ऑफर? हृदयविकाराचा झटका टाळण्यासाठी योग्य वेळी निदान होणे अत्यंत आवश्यक असते. हे लक्षात घेऊन, एरवी ४९०० रुपये किंमत असलेली संपूर्ण रक्त तपासणी आणि आरोग्य चाचणी आता फक्त ७९९ रुपयांत उपलब्ध करून देण्यात आली आहे. विशेष म्हणजे, रक्त तपासणीसोबत १८०० रुपये किमतीची ‘स्ट्रेस टेस्ट’ मोफत दिली जाणार आहे.
तपासणीमध्ये कोणत्या चाचण्यांचा समावेश आहे?
या शिबिरात खालील महत्त्वाच्या चाचण्या केल्या जातील: रक्त तपासणी: CBC, हिमोग्लोबिन, HbA1c (मधुमेह तपासणी), लिपिड प्रोफाइल (कोलेस्ट्रॉल), लिव्हर प्रोफाइल, किडनी फंक्शन टेस्ट आणि थायरॉईड (TSH). मोफत चाचण्या: ईसीजी (ECG), बीपी, वजन, उंची, शरीरातील ऑक्सिजन (SPO2), रँडम ब्लड शुगर आणि बीएमआय (BMI).
तज्ज्ञांचे मार्गदर्शन: तपासणीनंतर हृदयविकार तज्ज्ञ डॉक्टरांकडून मोफत सल्ला आणि मार्गदर्शन दिले जाईल.
याशिवाय हार्ट डिसीज, ब्लॉकेजेस, डायबेटिस आणि हाय बीपी रिव्हर्सलसाठी विशेष कन्सल्टेशन देखील उपलब्ध असेल.
शिबिराची वेळ आणि ठिकाण:
दिनांक: १ मार्च
वेळ: सकाळी ८:०० ते ११:०० वाजेपर्यंत
ठिकाण: माधवबाग क्लिनिक, छत्रपती कॉलनी, बाळेश्वर नाका, कुर्डुवाडी रोड, बार्शी.
नाव नोंदणीसाठी संपर्क:
अधिक माहितीसाठी किंवा नाव नोंदणीसाठी ७२७६५१९१११ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन माधवबाग क्लिनिकतर्फे करण्यात आले आहे.
टीप: योग्य निदान आणि मार्गदर्शन ९०% हृदयविकाराचा झटका टाळू शकते. तरी बार्शीतील नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा.





