निवडमहाराष्ट्रसोलापूर

कोलंबिया निवडणुकीसाठी आंतरराष्ट्रीय निरीक्षक म्हणून सोलापूरचे जिल्हाधिकारी आशीर्वाद कुमार यांची निवड

सोलापूरचे जिल्हाधिकारी कोलंबियात आंतरराष्ट्रीय निरीक्षक

B1न्यूज मराठी नेटवर्क50000

सोलापूर : सोलापूरचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी श्री. कुमार आशीर्वाद यांची प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय जबाबदारीसाठी निवड झाली आहे. महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी श्री. चोकलिंगम सेथुरामन यांच्या नेतृत्वाखालील पाच सदस्यीय शिष्टमंडळ 6 ते 10 मार्च 2026 दरम्यान कोलंबिया प्रजासत्ताकात अधिकृत दौऱ्यावर जाणार आहे.

या शिष्टमंडळाला कोलंबियाच्या Consejo Nacional Electoral चे प्रमुख यांच्याकडून 8 मार्च रोजी होणाऱ्या काँग्रेस निवडणुकीसाठी आंतरराष्ट्रीय निरीक्षक म्हणून आमंत्रित करण्यात आले आहे. भारताच्या निवडणूक आयोगाच्या Global Engagement for Electoral Excellence (GEEE) या उपक्रमांतर्गत ही नियुक्ती झाली असून, महाराष्ट्र राज्याला कोलंबियाशी विशेष संवाद व अनुभवविनिमयाची जबाबदारी देण्यात आली आहे.500000शिष्टमंडळातील सदस्यांमध्ये आशीर्वाद कुमार यांच्यासह मनोहर रामचंद्र पारकर (संयुक्त मुख्य निवडणूक अधिकारी), प्रीयेश महाजन (निवडणूक नोंदणी अधिकारी, रामटेक), सागर शिर्के (बूथ लेव्हल अधिकारी, नाशिक) यांचा समावेश आहे.

या दौऱ्यात भारतीय निवडणूक व्यवस्थेचा अनुभव जागतिक स्तरावर पोहोचविणे, तसेच कोलंबियातील निवडणूक प्रक्रियेचे निरीक्षण करून सर्वोत्तम पद्धतींचा अभ्यास करणे हे उद्दिष्ट आहे.

सोलापूर जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब म्हणजे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांची या आंतरराष्ट्रीय निरीक्षण मोहिमेसाठी निवड झाली असून, यामुळे भारतीय निवडणूक व्यवस्थेतील पारदर्शकता व विश्वासार्हतेला जागतिक मान्यता मिळत आहे.500000

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button