बार्शी तालुका पोलिसांची धडाकेबाज कारवाई, गोळीबार करून दहशत माजवणारी टोळी ५ तासांत जेरबंद

0

B1न्यूज मराठी नेटवर्क50000

बार्शी : तालुक्यातील कुसळंब येथे किरकोळ कारणावरून पिस्टलने गोळीबार करून जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या आणि परिसरात दहशत माजवून पळून गेलेल्या टोळीला बार्शी तालुका पोलिसांनी केवळ ५ तासांत सिनेमॅटिक पाठलाग करून बेड्या ठोकल्या आहेत. पोलिसांनी आरोपींकडून एक देशी बनावटीचे पिस्टल, जिवंत काडतूस, कोयता आणि गुन्ह्यात वापरलेली कार असा मुद्देमाल जप्त केला आहे.

गुरुवार दि. २६ फेब्रुवारी रोजी मौजे कुसळंब येथे तीन इसमांनी एका व्यक्तीला किरकोळ कारणावरून जीवे मारण्याच्या उद्देशाने बेदम मारहाण केली. एवढेच नव्हे तर पिस्टलने फायरिंग करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. या घटनेमुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली होती. घटनेचे गांभीर्य ओळखून बार्शी तालुका पोलीस ठाण्यात बीएनएस १०९(१), ११८(१) आणि शस्त्र अधिनियम कलम ३, २७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.

पाच तासांत असा लागला छडा गुन्हा दाखल होताच पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी आणि अपर पोलीस अधीक्षक प्रितम यावलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक सायकर यांच्या मार्गदर्शनाखाली दोन पथके तात्काळ रवाना करण्यात आली. सहायक पोलीस निरीक्षक दिलीप ढेरे आणि पोलीस उपनिरीक्षक बालाजी वळसने यांना तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळाली की, आरोपी हे करमाळा परिसरात पळून गेले आहेत. पोलिसांनी मोठ्या शिताफीने पाठलाग करून अवघ्या ५ तासांत तिन्ही आरोपींना शस्त्रांसह ताब्यात घेतले.5000अटक केलेले आरोपी
१. योगेश भास्कर मोरे (वय २९, रा. कुसळंब, सध्या रा. हडपसर, पुणे)
२. राहूल दत्ता गायकवाड (वय २६, रा. कुंभारगाव, ता. करमाळा, सध्या रा. मांजरी रोड, पुणे)
३. रोशन दत्तात्रय पिसाळ (वय ३२, रा. हडपसर, पुणे)
जप्त केलेला मुद्देमाल–
१ देशी बनावटीचे पिस्टल आणि १ जिवंत काडतूस,
१ कोयता, २ लोखंडी रॉड आणि १ लाकडी दांडके
गुन्ह्यात वापरलेली HYUNDAI AURA चारचाकी गाडी

पोलीस कोठडी
सर्व आरोपींना प्रथमवर्ग न्यायालयात न्यायाधीश श्रीमती रेवती बागडे यांच्यासमोर हजर केले असता, त्यांनी आरोपींना दिनांक ०२/०३/२०२६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. याकामी सरकारी अभियोक्ता पवार यांनी प्रभावी युक्तीवाद केला.

तपास पथक
ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक प्रितम यावलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक सायकर यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि दिलीप ढेरे, पीएसआय बालाजी वळसने, पोहेकॉ राजेंद्र मंगरुळे, एएसआय सदाशिव गवळी, धनराज केकाण, राहुल बोंदर, ओमप्रकाश दासरे, बालाजी हांगे, रतन जाधव (सायबर पोलीस) आणि तानाजी पाटील यांच्या पथकाने केली आहे.
5000

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या