कॉम्रेड प्रा. तानाजी ठोंबरे यांना विद्रोही साहित्य संमेलनाचा जीवनगौरव पुरस्कार

0

B1न्यूज मराठी नेटवर्क50000

बार्शी : 27, 28 फेब्रुवारी व 1 मार्च 2026 रोजी नांदेड येथे होत असलेल्या 20 व्या विद्रोही मराठी साहित्य संमेलनामध्ये कॉम्रेड प्रा. तानाजी ठोंबरे यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे. नांदेड येथे होणाऱ्या विद्रोही साहित्य संमेलना विद्रोही साहित्य संमेलन हे महात्मा फुल्यांनी प्रस्थापितांच्या साहित्यिकांवर घेतलेली बहिष्काराची भूमिका विद्रोही साहित्य समेलनान पुढे घेऊन जात आहे. कॉम्रेड तानाजी ठोंबरे यांनी 2005 साली सोलापूर येथे झालेल्या विद्रोही साहित्य संमेलनाचे संयोजन केले होते. 5000विद्रोहीच्या गाजलेल्या साहित्य संमेलनांपैकी सोलापूर जिल्ह्यातील साहित्य संमेलन हे टोकाचे गाजलेले साहित्य संमेलन ठरले होते. 2015 साली बार्शी मध्ये झालेल्या कॉम्रेड अण्णाभाऊ साठे साहित्य संमेलन संयोजन समितीचे ते अध्यक्ष होते. प्रा. ठोंबरे यांनी महात्मा फुले यांची शैक्षणिक भूमिका, विठ्ठल रामजी शिंदे, आगरकरांचे साहित्य विचार, शाहिर अमर शेख, कॉम्रेड गुलाबराव गणाचार्य, कॉम्रेड ए.बी. बर्धन अशा विविध विषयांवर पुस्तके लिहिली आहेत. ठोंबरे यांनी संपूर्ण हयात मार्क्स-फूले -आंबेडकरवादी विद्रोही विचाराने दलित , कामगार , शेतकरी, विद्यार्थी, युवकांच्या चळवळीमध्ये त्यांनी काम केले आहे. भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्य कार्यकारणी सदस्य म्हणून देखील त्यांनी काम केले आहे.

नांदेड येथे होत असलेल्या विद्रोही साहित्य संमेलनाध्यक्ष लोकनाथ यशवंत, नागपूर ; उद्घघाटक बजरंग तिवारी, दिल्ली; स्वागताध्यक्ष राहुल प्रधान; मिलिंद आव्हाड ,जेएनयू , दिल्ली ; त्याचप्रमाणे विद्रोही साहित्य संस्कृती सभेच्या राज्याध्यक्षा प्रा. प्रतिमा परदेशी; किशोर धमाले यांच्या उपस्थितीत हा जीवनगौरव पुरस्कार दिला जाणार आहे.50000

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या