नोंदणी व मुद्रांक विभागाच्या शिपाई (गट-ड) संवर्गातील २८४ उमेदवारांची अंतिम निवड यादी जाहीर; २ मार्च रोजी समुपदेशन

0

B1न्यूज मराठी नेटवर्क50000

पुणे : नोंदणी व मुद्रांक विभागातील शिपाई (गट-ड) संवर्गातील २८४ उमेदवारांची अंतिम निवड यादी, प्रतीक्षा यादी तसेच निवडीस नकार दिलेल्या, अपात्र व कागदपत्र पडताळणीस गैरहजर उमेदवारांची यादी विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर www.igrmaharashtra.gov.in⁠� वर २७ फेब्रुवारी २०२६ रोजी प्रकाशित करण्यात आली आहे.500000अंतिम निवड यादीतील उमेदवारांचे समुपदेशन करून नियुक्ती देण्यात येणार आहे. संबंधित उमेदवारांनी दिनांक २ मार्च २०२६ रोजी सकाळी ८ वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे येथील बहुउद्देशीय सभागृह (पाचवा मजला) येथे आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहावे, असे आवाहन नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक रविंद्र बिनवडे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.5000

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या