पोक्सो गुह्याचा आरोप असलेल्या आरोपीचा जामीन मंजूर
B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : बार्शी शहर पोलिस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर १२/२०२६ नुसार आरोपी शुभम संदीप निकाळजे रा.बार्शी जि.सोलापूर याच्यावर फिर्यादीच्या डोक्यात हाताने मारून,शिविगाळ केलेप्रकरणी फिर्यादीच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्ये केल्याने आरोपीवर बीएनएस कलम -७४, ७९, ११५ (२), ३५१(२),३५१(३),३५२ व पोक्सो कलम-१२ प्रमाणे गुन्हा दाखल होता.सदर संशयित आरोपीच्या वतीने बार्शी येथील मे. जिल्हा व सत्र न्यायाधीश मा. व्ही. के. मांडे साहेब यांच्या न्यायालयात अॅड. विवेक गजशिव यांच्यावतीने जामीन अर्ज दाखल केला होता.
यावेळी आरोपीचे वकील यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य धरत अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश व्ही.के. मांडे साहेब यांनी वर नमूद आरोपीचा जामीन अर्ज मंजूर केला.यावेळी आरोपींच्यावतीने अॅड. विवेक गजशिव, अॅड. श्रीराम काशीद, अनुराग मेटकरी यांनी काम पाहिले.





