निवडपुणेमहाराष्ट्र

पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्यात २२७ उमेदवारांची निवड

B1न्यूज मराठी नेटवर्क50000

पुणे : कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या पुणे कार्यालयामार्फत भोर, मुळशी, पुरंदर व हवेली तालुक्यामध्ये मंगळवारी (१७ फेब्रुवारी) पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्यात २२७ उमेदवारांची निवड करण्यात आली आहे, अशी माहिती सहायक आयुक्त सुरेश वराडे यांनी दिली आहे.50000मुळशी तालुक्यात सिम्बॉयसिस सेंटर फॉर ट्रेनिंग इन अॅडवान्स मॅन्युफॅक्चरिंग टेक्नॉलॉजिस, सिम्बॉयसिस कम्युनिटी कॉलेज, दारवली येथे एकूण ७९ बेरोजगार उमेदवार, भोर तालुक्यातील सरदार कान्होजी जेधे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, मांढरदेवी रोड येथे एकूण १९, भारतीय जैन संघटनेचे कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, वाघोली येथे एकूण ५८, तसेच पुरंदर तालुक्यातील क्रांतिकारक उमाजी नाईक शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था दिवे येथे एकूण ७१ बेरोजगार उमेदवारीची निवड करण्यात आली आहे. यावेळी एकूण ५८ उद्योजकांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या आहेत, अशी माहिती वराडे यांनी दिली आहे.50000

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button