अहिल्यानगरआरोग्यमहाराष्ट्र

‘हिंद की चादर’ गुरु तेग बहादूर शहीदी समागम वर्षानिमित्त आरोग्य पंधरवडा १ हजार ९२ रुग्णांनी घेतला लाभ

B1न्यूज मराठी नेटवर्क500000

अहिल्यानगर,दि.१६ : हिंद की चादर” गुरु तेग बहादूर यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा रुग्णालय अहिल्यानगर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात विशेष आरोग्य पंधरवड्याचे आयोजन करण्यात आले असून, १५ फेब्रुवारी २०२६ अखेर जिल्ह्यातील ७ ग्रामीण रुग्णालयांमध्ये १ हजार ९२ लाभार्थ्यांनी या शिबिराचा लाभ घेतला आहे.

या मोहिमेंतर्गत जिल्ह्यातील १ जिल्हा रुग्णालय, ३ उपजिल्हा रुग्णालये व २२ ग्रामीण रुग्णालयांमध्ये दि.११ फेब्रुवारी २०२६ ते २५ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत विविध वैद्यकीय शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. सर्वसामान्यांपर्यंत आरोग्य सेवा पोहोचविणे हा या मागील मुख्य उद्देश आहे.

या शिबिरामध्ये नागरिकांसाठी विविध आरोग्य सुविधा मोफत उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. यामध्ये उच्च रक्तदाब, मधुमेह, रक्ताक्षय, क्षयरोग तपासणी, मुख, स्तन व गर्भाशय मुखाचा कर्करोग तपासणी, गरोदर मातांची तपासणी, बाल लसीकरण, किरकोळ शस्त्रक्रिया, एक्सरे, ईसीजी व प्रयोगशाळा चाचण्या यांसारख्या महत्त्वाच्या सेवांचा समावेश आहे. याशिवाय पीएमजेएवाय व वय वंदन कार्डचे वितरणही करण्यात येत आहे.

शिबिरांच्या ठिकाणी शहीदी समागम कार्यक्रमाचे फलक लावून जनजागृती करण्यात येत असून, उपक्रमाची माहिती व जिओ टॅग केलेली छायाचित्रे संबंधित संकेतस्थळावर अपलोड करण्यात आली आहेत. जिल्ह्यातील गरजू रुग्णांनी या आरोग्य शिबिरांचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा आरोग्य प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.50000

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button