प्रा.डॉ. राहुल पालके यांची सोलापूर आकाशवाणी केंद्रावर कर्मवीर जीवनकार्य यावर मुलाखत संपन्न
B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : येथील श्री शिवाजी महाविद्यालयातील इंग्रजी विषयाचे सहाय्यक प्रा. डॉ.राहुल पालके यांची कर्मवीर सप्ताह व जागतिक रेडिओदिनी सोलापूर आकाशवाणी केंद्रावर मुलाखत दि. १३ फेब्रुवारी २०२६ रोजी संपन्न झाली. त्यांच्या या मुलाखतीचा केंद्रबिंदू कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे यांचे जीवनकार्य हा होता. बहुजन हिताय, बहुजन सुखाय या संकल्पनेचा अनुभव प्रत्येकाला येण्यासाठी आकाशवाणी केंद्राचा मोलाचा वाटा आहे.
प्रसारभारती आकाशवाणी सोलापूर केंद्राच्या एफ एम १०३. ४ मेगाहर्टझ(FM 103.4 MHz) तसेच जगभरातील श्रोत्यांसाठी न्यूज ऑन एअर (Newsonair) या प्रसारभारतीच्या ॲपवर ही मुलाखत प्रसारित होणार आहे.
या मुलाखतीमध्ये डॉ. पालके यांनी साहित्य व समाज या विषयावर विवेचन करताना कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे यांच्या जीवन व कार्यावर यावर प्रकाश टाकला आहे. त्यांच्या स्वलिखित अंगणातून नभांगणात, कर्मांजली, कर्माक्षरे व कर्मवीर प्रेरणा या साहित्यिक कृतींतून कर्मवीर डॉ. मामांचे कार्य प्रस्तुत होते. त्यांनी या मुलाखतींमधून नेट-सेट परीक्षा, ॲनिमल फ्रेंडज क्लब, साहित्य संमेलने, परिषदा यांचा साहित्य यांचा परस्पर संबंध मांडला आहे.
साहित्यिक अनुभवांचा गोषवारा मांडून त्यांनी ग्रामीण साहित्याची सद्यस्थिती यावर भाष्य केले. कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे यांच्या विविधांगी कार्याचा परिचय देत मी कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे मामा बोलतोय , शिवगुंजन या कवितांचे उत्कृष्ट सादरीकरण केले आहे. या निमित्ताने कर्मवीरांच्या कार्याला उजाळा दिलेला आहे.
याचबरोबर त्यांनी कवितेचं पान सजलं ही विनोदी कविता तर डिजीटल दुनिया ही व्यंगात्मक कविता सादर करून श्रोत्यांना विचारप्रवर्तक केले आहे. त्यांची ही मुलाखत प्रेरणादायी असून ओघवत्या शैलीत आहे. त्यातून साहित्यिक विश्व संपन्न केले आहे. या मुलाखतीत त्यांचे नेट व सेट या परीक्षांचे व्यक्तिगत अनुभव ऐकायला मिळणार आहेत. त्यांनी नेट व सेट परीक्षेत मिळविलेले यश ही संघर्षमय वाटचाल होती.
परिस्थितीवर मात करून परिस्थिती कशी बदलता येते व त्यातून साहित्य कसे गतिमान होते हा आत्मविश्वास या मुलाखतीतून श्रोत्यांना ऐकण्यास मिळणार आहे. एकंदरीत त्यांच्या मुलाखतीतून बार्शीची साहित्यिक परंपरा उजळली. या मुलाखतीसाठी आकाशवाणी सोलापूर केंद्राचे प्रमुख श्री सोमेश्वर पाटील यांचे सहकार्य लाभले तर वाघमोडे मॅडम यांच्याबरोबर त्यांनी संवाद साधला.
या मुलाखती दरम्यान त्यांचा विद्यार्थी आनंद लोंढे हा उपस्थित होता. त्यांच्या या यशाबद्दल श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ बार्शीचे अध्यक्ष डॉ. बी. वाय.यादव, उपाध्यक्ष नंदन जगदाळे, सचिव पी. टी. पाटील, सहसचिव ए.पी. देबडवार, खजिनदार व सांस्कृतिक विभाग प्रमुख बापूसाहेब शितोळे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए बी शेख, इंग्रजी विभागप्रमुख डॉ. समाधान पवार, इतर प्राध्यापक व कर्मचारी, विद्यार्थी यांनी त्यांचे अभिनंदन केले.





