पीएम विश्वकर्मा योजनेअंतर्गत नांदेड येथे तीन दिवसीय प्रदर्शन व विक्री कार्यक्रम

0

B1न्यूज मराठी नेटवर्क

नांदेड : एमएसएमई विकास कार्यालय छत्रपती संभाजीनगर व खादी ग्रामोद्योग मंडळ नांदेड यांच्यावतीने प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेअंतर्गत प्रदर्शनी व विक्री कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ही प्रदर्शनी 4 ते 6 फेब्रुवारी 2026 दरम्यान लोकमान्य मंगल कार्यालय अण्णाभाऊ साठे चौक, सम्राट नगर नांदेड येथे होणार असून दररोज सकाळी 11 ते सायं. 7 या वेळेत सर्वांसाठी खुली राहणार.

या प्रदर्शनीत पारंपरिक कारागीर व शिल्पकारांनी आपल्या वस्तु आणि कौशल्याचे प्रदर्शन व थेट विक्री करण्याची संधी मिळणार आहे. यामध्ये सुतार, अस्त्रनिर्माते, लोहार, सुवर्णकार, कुंभार, मूर्तिकार, मोची, चटई, झाडू बनवणारे पारंपरिक बाहुली व खेळणी निर्माते, मालाकार या सर्वांना सुवर्ण संधी मिळाली आहे.

या कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या हस्ते 4 फेब्रुवारीला सायं. 4 वा. होणार आहे. प्रमुख पाहुणे म्हणून महानगरपालिका आयुक्त, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, Lead District Manager, महाव्यवस्थापक जिल्हा उद्योग केंद्र, कौशल्य विकास विभाग नांदेड उपस्थित राहणार आहेत.

सर्व नागरिकांनी या प्रदर्शनीला भेट देऊन PM Vishwakarma बंधु आणि बहिणींच्या उद्योगांना प्रोत्साहन द्यावे. अधिक माहिती व स्टॉल बुकिंगसाठी दूरध्वनी क्रमांक ८६००८४२६०१, ९५९९६३२१८६, ८२९८६३२१४५ वर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी नांदेड यांनी केले आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या