अहिल्यानगरमहसूलमहाराष्ट्रशिबीर

शिवराज्याभिषेक दिनानिमित्त महसूल समाधान शिबिरात १३६ दाखल्यांचे वाटप; नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

B1न्यूज मराठी नेटवर्क

शिर्डी, दि. २६ – छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान अंतर्गत आज कोपरगाव मंडळाधिकारी कार्यालयात आयोजित शिबिरात १३६ महसूल दाखल्यांचे तहसीलदार महेश सावंत यांचे हस्ते वाटप करण्यात आले. या शिबिरात शेतकरी, महिला, विद्यार्थी तसेच संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ योजनेच्या लाभार्थ्यांना महसूल विषयक विविध दाखले व लाभ प्रदान करण्यात आले.

शिबिरास शिर्डी उपविभागीय अधिकारी माणिक आहेर व कोपरगाव तहसीलदार महेश सावंत यांनी मार्गदर्शन केले.

शिबिरात उत्पन्न दाखले – ४०, जातीचे दाखले – २२, जिवंत ७/१२ मोहिमेंतर्गत वारस फेरफार – ८, रेशनकार्ड वाटप – २१, ७/१२ व ८ अ उतारे – ४५, संजय गांधी व श्रावण बाळ योजनेचे लाभार्थी – १८ अशा एकूण १३६ दाखल्यांचे वाटप करण्यात आले.

यावेळी निवासी नायब तहसीलदार श्रीम. प्रफुल्लिता सातपुते, मंडळाधिकारी मच्छिंद्र पोकळे, ग्राम महसूल अधिकारी जगदीश शिरसाठ (कोपरगाव), अश्विनी निर्मळ (येसगाव), वैशाली दुकळे (मुर्शतपूर), वाल्मिक पवार (शिंगणापूर) तसेच महसूल सेवक व कर्मचारी उपस्थित होते.

या शिबिराला कोपरगाव मंडळातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. महसूल सेवा थेट शिबिरात उपलब्ध झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले.5000

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button