प्रशासकीय प्रजासत्ताक दिन सोहळ्यात न्यू हायस्कूलच्या विद्यार्थ्यांच्या यशाचा त्रिवेणी संगम

0

B1न्यूज मराठी नेटवर्क

बार्शी : बार्शी येथील भगवंत मैदानावर आयोजित प्रशासकीय प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यात नवमहाराष्ट्र विद्या विकास मंडळाच्या न्यू हायस्कूल (शेठ अगरचंद कुंकूलोळ हायस्कूल)च्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट सादरीकरण करत यशाचा त्रिवेणी संगम साधला.

या सोहळ्यात न्यू हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेले कमांडो-शैलीतील व आकर्षक वेशभूषेतील शिस्तबद्ध संचलन उपस्थितांचे विशेष आकर्षण ठरले. शिस्तबद्ध हालचाली, आत्मविश्वासपूर्ण सादरीकरण व प्रभावी मांडणीमुळे परीक्षकांनी विद्यार्थ्यांचे भरभरून कौतुक केले.

कमांडो-शैलीतील शिस्तबद्ध संचलन स्पर्धेत मुलींच्या गटाने प्रथम क्रमांक पटकावला, तर मुलांच्या गटाने द्वितीय क्रमांक मिळवला. मुलींच्या गटाचे नेतृत्व कमांडर सृष्टी गायकवाड हिने, तर मुलांच्या गटाचे नेतृत्व कमांडर सोहम परदेशी याने प्रभावीपणे केले.
तसेच विशेष बँड पथक सादरीकरणात न्यू हायस्कूलच्या पथकास प्रथम क्रमांक देण्यात आला.

या बँड पथकाचे नेतृत्व अल्फाज पठाण याने केले. या यशाबद्दल बार्शी नगरपालिकेच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा तेजस्विनीताई कथले, तहसीलदार एफ. आय. शेख, पोलीस निरीक्षक बालाजी कुकडे यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करून विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यात आले.

या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देऊन त्यांच्यात शिस्त, संघभावना व आत्मविश्वास निर्माण करणारे क्रिडाशाक्षक अरविंद कोळी यांच्या मेहनतीचे सर्वत्र कौतुक करण्यात आले. या यशाबद्दल संस्थेचे पदाधिकारी, मुख्याध्यापक, शिक्षकवर्ग तसेच पालकांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या