जवळा नि. येथे हळदी – कुंकू व तिळगुळ वाटप कार्यक्रम संपन्न

0

B1न्यूज मराठी नेटवर्क

परांडा : परांडा तालुक्यातील जवळा नि येथे चौधरी , वाघचौरे परिवाराकडून हळदी-कुंकू, तिळगुळ वाटप मोठ्या उत्साहात कार्यक्रम संपन्न झाला. सोमवार, दि. २६ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी 4 वाजता विविध क्षेत्रातील महिला यावेळी उपस्थित होत्या.50000हळदी-कुंकू कार्यक्रमाचे महत्त्व -हिंदू धर्मात हळदी-कुंकू या समारंभाला विशेष महत्त्व आहे. हा सण प्रामुख्याने स्त्रियांचा मानला जातो. याद्वारे एकमेकींच्या सौभाग्यासाठी शुभेच्छा दिल्या जातात आणि सामाजिक जवळीक वाढवली जाते. कार्यक्रमाचे स्वरूप – निमंत्रण: संक्रांतीपासून ते रथसप्तमीपर्यंतच्या काळात सुवासिनींना घरी बोलावले जाते. हळद-कुंकू लावणे: घरी आलेल्या सुवासिनींचे स्वागत करून त्यांना कपाळावर हळद आणि कुंकू लावले जाते. ​अत्तर व गुलाबपाणी: पाहुण्यांच्या हातावर अत्तर लावून गुलाबाच्या पाण्याचा शिडकावा केला जातो. वाण देणे: हे या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण आहे. स्टीलची भांडी, कपडे, सौंदर्य प्रसाधने किंवा उपयुक्त वस्तू ‘वाण’ म्हणून दिल्या जातात. ओटी भरणे: काही ठिकाणी खण-नारळाने ओटी भरण्याचीही पद्धत आहे.

महिलांसाठी आयोजित हळदी-कुंकू समारंभात उपस्थितांना तिळगुळ वाटप करण्यात आले. सर्व महिलांनी उखाणे नावे वेगवेगळ्या पद्धतीने उखाणे घेतली.50000यावेळी दिपाली चौधरी , पुजा चौधरी , राणी वाघचौरे, सानिका थोरात, रिया थोरात , संजना वाघचौरे , सविता चौधरी , सोनाली वाघचौरे, काशीबाई चौधरी, राजश्री वाघचौरे, रेश्मा कुचेकर इतर महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.50000

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या