बार्शीत शेखर मोबाईलकडून अनुभवी कर्मचाऱ्यांची भरती सुरू

B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : शहरातील टिळक चौक परिसरातील शेखर मोबाईल येथे मोबाईल रिपेअरिंग व तांत्रिक कामाचा अनुभव असलेल्या अनुभवी कर्मचाऱ्यांची भरती सुरू करण्यात आली आहे. मोबाईल सॉफ्टवेअर व हार्डवेअरचे ज्ञान असलेल्या तसेच मोबाईल दुरुस्ती क्षेत्रात कामाचा अनुभव असलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाणार असल्याची माहिती संस्थेच्या वतीने देण्यात आली.
या पदासाठी इच्छुक उमेदवारांना दुचाकी चालवता येणे आवश्यक असून प्रामाणिक, मेहनती आणि जबाबदार व्यक्तींना संधी दिली जाणार आहे. निवड झालेल्या उमेदवारांना आकर्षक कामाचे वातावरण तसेच अनुभव व पात्रतेनुसार दरमहा १० हजार रुपयांपर्यंत वेतन देण्यात येणार आहे.
मोबाईल रिपेअरिंग क्षेत्रात करिअर घडवू इच्छिणाऱ्या युवकांसाठी ही चांगली संधी असून इच्छुकांनी अधिक माहितीसाठी अथवा मुलाखतीसाठी ९६५७६९२००९ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.




