प्रशासनबार्शीमहाराष्ट्र

बार्शी तालुका पोलिस ठाण्याचे सपोनि अक्षय सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली ‘ऑल आऊट’ मोहीम! शिक्षक-पदवीधर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रात्रभर धडक कारवाई; २१ इसमांविरुद्ध कारवाई…

B1न्यूज मराठी नेटवर्क500

बार्शी : शिक्षक-पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी बार्शी तालुका पोलिसांनी रात्रभर विशेष कॉम्बिंग ऑपरेशन आणि ‘ऑल आऊट’ नाकाबंदी मोहीम राबवली. सहायक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात आलेल्या या मोहिमेत विविध ठिकाणी तपासणी करून मद्यपान करून वाहन चालविणारे, अवैध मद्यविक्री करणारे तसेच न्यायालयीन अजामीनपात्र वॉरंटमधील आरोपींविरुद्ध कारवाई करण्यात आली. या मोहिमेदरम्यान विविध प्रकरणांत एकूण २१ इसमांविरुद्ध कारवाई करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

निवडणूक काळात अनुचित प्रकार घडू नयेत आणि शांतता व सुव्यवस्था कायम राहावी, या उद्देशाने बार्शी तालुका पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली. या मोहिमेदरम्यान चार हॉटेल्स आणि दोन लॉजची तपासणी करण्यात आली. तसेच चार पाहिजे व फरारी आरोपींचा शोध घेण्याच्या अनुषंगाने तपासणी करण्यात आली. तीन सराईत गुन्हेगारांचीही तपासणी करण्यात आली.

रात्रीच्या वेळी पोलिसांनी विविध ठिकाणी नाकाबंदी करून वाहनचालकांची तपासणी केली. मद्यपान करून वाहन चालविणाऱ्यांविरुद्ध चार गुन्हे दाखल करण्यात आले. मोटार वाहन कायद्यानुसार १२ प्रकरणांत कारवाई करून एकूण ८ हजार ५०० रुपयांचा दंड आकारण्यात आला.

अवैध मद्यविक्रीप्रकरणी कारवाई; २,३०० रुपयांची दारू जप्त
बार्शी तालुक्यातील हॉटेल रेश्मा येथे पोलिसांनी कारवाई करून २ हजार ३०० रुपये किमतीची दारू जप्त केली. या प्रकरणी अश्विन मधुकर घाडगे (रा. गाताचीवाडी, ता. बार्शी, जि. सोलापूर) याच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५ तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३३(१)(W) अन्वये कारवाई करण्यात आली.

याशिवाय महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम १२२(क) अन्वये एक गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणात राज सचिन जगताप (वय २१, रा. जामगाव आ.) आणि प्रेम रावसाहेब लोहार (वय २१, रा. धानोरे, ता. बार्शी) यांच्याविरुद्ध कारवाई करण्यात आली.500मद्यपान करून वाहन चालविणे हे स्वतःच्या तसेच इतरांच्या जीवितासाठी धोकादायक असल्याने पोलिसांनी अशा वाहनचालकांविरुद्ध विशेष तपासणी मोहीम राबवली. या मोहिमेत चार जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले. यामध्ये आनंदा बापू पाटील (वय ४४, रा. सुरुपली, ता. कागल, जि. कोल्हापूर), लक्ष्मण संदिपान लाड (वय ३२, रा. हासेगाव, ता. कळंब, जि. धाराशिव), आप्पासाहेब हनुमंत मोरे (वय ३५, रा. घाडगे वस्ती, खर्डी, ता. पंढरपूर, जि. सोलापूर) आणि कौस्तुभ धनराज महाडीक (वय ३०, रा. मोहम्मदवाडी, ता. पुरंदर, जि. पुणे) यांचा समावेश आहे.

न्यायालयाने जारी केलेल्या अजामीनपात्र वॉरंटची अंमलबजावणी करताना पोलिसांनी चार वॉरंट बजावले असून, दोन आरोपींना अटक केली. या कारवाईत गणेश शिवशंकर गाढवे (रा. आरणगाव, ता. बार्शी) आणि रावसाहेब उर्फ रावसो पोपट काळे (रा. धोत्रे, ता. बार्शी) यांच्याशी संबंधित वॉरंट कारवाईचा समावेश आहे.

वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांचे पथक सक्रिय
पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुहास जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली ही विशेष मोहीम राबविण्यात आली.

या मोहिमेत सहायक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे, पोलीस उपनिरीक्षक आबासाहेब शिरगिरे यांच्यासह पोलीस अंमलदार राजेंद्र मंगरूळे, अमृत खेडकर, प्रदीप जगताप, पांडुरंग देशमुख, सिद्धेश्वर लोंढे, गोविंद बचुटे, सागर चव्हाण, महमद महेदी, अमृता गुंड, रमेश माने, सागर वाकळे, हनुमंत काळेल, बापूसाहेब लोकरे, ज्ञानेश्वर वाघमोडे, उत्तम चौधरी, बाबासाहेब हांडे आणि निलेश चौधरी यांनी सहभाग घेतला.

शिक्षक-पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था राखणे, अवैध धंद्यांवर नियंत्रण ठेवणे, मद्यपान करून वाहन चालविणाऱ्यांविरुद्ध कारवाई करणे आणि न्यायालयीन वॉरंटमधील आरोपींचा शोध घेणे, या उद्देशाने ही मोहीम राबविण्यात आली. सपोनि अक्षय सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली रात्रभर राबविण्यात आलेल्या या मोहिमेत विविध प्रकरणांत केलेल्या कारवाईमुळे निवडणूक काळात शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी बार्शी तालुका पोलिसांनी विशेष दक्षता घेतल्याचे दिसून आले.500

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button