कृषीमहाराष्ट्रसोलापूर

पंचनामे १०० टक्के पूर्ण; वस्तुस्थितीनुसार अहवाल सादर कराजिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांचे तहसीलदार व तालुका कृषी अधिकाऱ्यांना निर्देश

B1न्यूज मराठी नेटवर्क500

सोलापूर : राज्य शासनाने सोलापूर जिल्ह्यातील अकराही तालुक्यांत दुष्काळ जाहीर केल्यानंतर प्रशासनाला सरसकट पीक नुकसान पंचनामे करण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्यानुसार पंचनामे करण्याची कार्यवाही १०० टक्के पूर्ण झाली आहे. आता सर्व तहसीलदारांनी संबंधित तालुका कृषी अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेऊन वस्तुस्थितीनुसार सरसकट पंचनाम्यांचा अहवाल सादर करावा, तसेच सुधारित अ, ब, क, ड प्रपत्रे भरून द्यावीत, असे निर्देश जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी दिले.

दुष्काळी परिस्थितीच्या अनुषंगाने करण्यात आलेल्या पंचनाम्यांची माहिती अचूक व वस्तुस्थितीदर्शक असणे आवश्यक आहे. त्यामुळे महसूल व कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी समन्वयाने काम करून पंचनाम्यांचे अहवाल आणि सुधारित प्रपत्रे विहित पद्धतीने पूर्ण करावीत, असे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
डिजिटल क्रॉप सर्वेच्या कामाला गती द्या- जिल्ह्यात डिजिटल क्रॉप सर्वे (पीक पाहणी) तपासणीचे कामही समाधानकारक नसल्याचे निदर्शनास आले आहे.
500संबंधित अधिकाऱ्यांनी या कामाची गती वाढवून प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करावीत. तसेच फार्मर आयडीसाठी प्रलंबित असलेली प्रकरणेही तात्काळ मार्गी लावावीत, असे निर्देश जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी दिले. या बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी अभिजित पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक, कृषी अधिकारी शुक्राचार्य भोसले, सर्व संबंधित उपविभागीय अधिकारी (प्रांताधिकारी), तहसीलदार आणि तालुका कृषी अधिकारी उपस्थित होते.500

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button