आरोग्य विभागाअंतर्गत अधिकाऱ्यांच्या बदल्या, बढत्या पारदर्शकपणे राज्य आरोग्य यंत्रणा संसाधन केंद्र यांच्या मूल्यांकन प्रणालीनुसार कामगिरीवर आधारीत व्हाव्यात – आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर

0

B1न्यूज मराठी नेटवर्क

मुंबई : सार्वजनिक आरोग्य विभागामध्ये कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांची बदली, बढती करताना ‘राज्य आरोग्य यंत्रणा संसाधन केंद्र’ (State Health Systems Resource Centre-SHSRC) च्या प्रणालीनुसार कामगिरीवर आधारित मूल्यांकन अहवाला नुसार पारदर्शकपणे करण्याच्या सूचना सार्वजनिक आरोग्यमंत्री ना. प्रकाश आबिटकर यांनी दिल्या आहेत.

केंद्र सरकारची ‘राष्ट्रीय आरोग्य यंत्रणा संसाधन केंद्र (National Health Systems Resorce nCentre-NHSRC) नवी दिल्ली’ ही संस्था देश पातळीवर आरोग्य विभागास तांत्रिक सहकार्य करते. त्याच धर्तीवर महाराष्ट्रात ‘राज्य आरोग्य यंत्रणा संसाधन केंद्र (state health systems resource centre -SHSRC) पुणे’ ही संस्था कार्यरत आहे. राज्याच्या आरोग्य विभागाची गुणवत्ता वाढ, आरोग्यविषयक संशोधन, व तांत्रिक सहकार्य या संस्थेच्या वतीने देण्यात येते.

आरोग्य विभागामार्फत SHSRC संस्था राज्यातील सर्व जिल्ह्यातील व महापालिका क्षेत्रातील आरोग्य संस्थांचे व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कामकाजाचे मूल्यांकन करते. तसेच त्यांचे कामगिरीवर आधारित गुणवतेनुसार दरमहा (रँकिंग) गुणानुक्रम देत असते. या रँकिंग प्रणालीमध्ये प्रशासकीय, तांत्रिक व वित्तीय बाबींचा समावेश असतो. यापुढे सार्वजनिक आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांच्या बदली, बढती करताना, कामगिरीवर आधारित मूल्यांकन (रँकिंग) प्रणालीच्या अहवालानुसार कार्यवाही करण्याच्या सूचना सार्वजनिक आरोग्यमंत्री यांनी दिल्या आहेत. या निर्णयामुळे आरोग्य सेवेचे कामकाज अधिक पारदर्शक होईल.

राज्यातील आरोग्य कार्यक्रम राबवण्यासाठी केंद्र व राज्य शासना मार्फत निधी उपलब्ध होत असतो. या निधीबरोबरच नागरिकांना आरोग्य सेवा अधिक प्रभावीपणे देण्यासाठी ‘कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सबीलिटी (#CSR)’ माध्यमातूनही निधी उपलब्ध करून घेणे आवश्यक आहे. त्यासाठी विभागाने सीएसआर देणाऱ्या संस्थांना प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना दिल्या.

राष्ट्रीय आरोग्य अभियाना अंतर्गत कार्यरत असलेले जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक (#DPM) व जिल्हा लेखा व्यवस्थापक (#DAM), एनएचएम सल्लागार, व एनएचएम कार्यक्रम अधिकारी यानी आपल्या कार्यक्षेत्रातील आरोग्य संस्थांना नियमित भेटी द्याव्यात. भेटीचा वस्तुनिष्ठ अहवाल सादर करावा. असे निर्देश आरोग्य मंत्र्यांनी दिले, यावेळी पदभरती, मानव संसाधन सुसूत्रीकरण, अधिकाऱ्यांनी भेटी दिलेल्या संस्थाच्या बाबतचे सादरीकरण केले.

बैठकीस आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. निपुण विनायक, सचिव ई. रवींद्रन, आरोग्य विभागाच्या आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे, आरोग्य सेवा संचालक डॉ. नितीन अंबाडेकर, संचालक डॉ. विजय कंदेवाड, सहसंचालक श्री राजेंद्र भालेराव, सह संचालिका डॉ. सुनीता गोल्हाईत, सह संचलिका डॉ. सरिता हजारे, माजी महासंचालक सल्लागार डॉ. सुभाष साळुंखे, डॉ. मोहन जाधव व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या