बार्शीमहाराष्ट्रसत्कार

बार्शी संचार आयोजित विद्यमान नगराध्यक्ष व सखी सम्राज्ञीचा सत्कार सोहळा संपन्न

B1न्यूज मराठी नेटवर्क

बार्शी : जो मालक असतो तो चालक असतो. त्यामुळे महिलांनी आपल्या सुप्त कलागुणांना वाव देऊन अर्थार्जन करावे. आपण महत्त्वाचे आहोत कारण पैसा आपण मिळवणार आहोत. म्हणून आपल्या आरोग्याकडे लक्ष देऊन आपण मिळवलेल्या पैशाचे योग्य विभाजन करता आले पाहिजे. त्यातून तिच्यातील “ती” चा विकास होतो. असे प्रतिपादन डॉ. प्रा. तेजस्विनी कांबळे यांनी कार्यक्रमाच्या अध्यक्षा व प्रमुख व्याख्यात्या म्हणून बोलत असताना व्यक्त केले.

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त बार्शी संचार आयोजित मिळून साऱ्याजणीच्या वतीने राधिका प्युअर व्हेज येथील हॉलमध्ये दिनांक 9 जानेवारी 2026 रोजी सायंकाळी ५ वाजता हा कार्यक्रम घेण्यात आला.

कार्यक्रमाच्या प्रारंभी सावित्रीमातेच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करण्यात आले. यानंतर मिळून साऱ्याजणीच्या सदस्या ममता कुरमुरे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. विद्यमान नगराध्यक्षा सौ.तेजस्विनी प्रशांत कथले व व्याख्यात्या डॉ. प्रा. तेजस्विनी कांबळे यांचा सत्कार संदीप मठपती व सौ.शिल्पा मठपती यांच्या हस्ते करण्यात आला. मिळून साऱ्याजणीचे पद्य गीत नृत्याविष्काराने सादर करण्यात आले.

2025 मध्ये वर्षभर बार्शी संचार यूट्यूब चैनल वर घेण्यात आलेल्या “सखी सम्राज्ञी” सन्मान विद्यमान नगराध्यक्षा सौ.तेजस्विनी प्रशांत कथले व व्याख्यात्या डॉ. प्रा. तेजस्विनी कांबळे यांच्या हस्ते करण्यात आला.

यामध्ये डॉ. सौ .वैशाली प्रशांत मोहिरे (एम .डी. आयुर्वेद ; गर्भसंस्कार) सौ प्रियंका रत्नाकर स्वामी (मॅनेजर.. व्यापारी सहकारी बँक बार्शी) सौ. उल्का नवजीवन डोंबे ( नेहा टेलरिंग फर्म ) सौ . दिपाली प्रसाद सहस्त्रबुद्धे (संगीत विशारद ) सौ . हेमा दीपक उपरे (सौंदर्यतज्ञ) सौ . विजया दत्तात्रय सुतार (बालवाडी शिक्षिका) सौ . वैशाली महेश नांदेडकर (शिव कलेक्शन साडी सेंटर) डॉ.सौ . श्रद्धा रोहन पाटील (स्त्रीरोग तज्ञ) सौ . सविता नरेंद्र वायकर (कलानिपुन) सौ . स्मिता दिलीप लुकडे (निवृत्त शिक्षिका एम आय टी ) डॉ. सौ. प्रीती महेश तोष्णीवाल (आहारतज्ञ.…डायटीशियन) सौ. अनुराधा महेश स्वामी (अंगणवाडी सेविका) सौ . तृप्ती तुषार गदगी (शिवण क्लास संचालिका) सौ . ममता विकास कुरमुडे (कंप्यूटर सेंटर) सौ . माधवी योगेश बरीदे (बालवाडी शिक्षिका) यांचा सन्मान करण्यात आला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. शिल्पा संदीप मठपती यांनी केले. आभार सौ. दाक्षायणी प्रभूराज स्वामी यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजक संदीप मठपती व मिळून साऱ्याजणीच्या सर्व सख्यांनी परिश्रम घेतले महिलांच्या उत्स्फूर्त प्रतिसादाने कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाची सांगता सौ. दिपाली प्रसाद सहस्त्रबुद्धे यांच्या सुरेल आवाजातील पसायदानाने झाली.50000

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button