पत्रकार संजय बारबोले, अरुण बळप यांना दलितमित्र पुरस्कार

B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : तालुक्यातील निर्भीड आणि धडाडीचे पत्रकार, तथा बार्शी प्रेस क्लबचे उपाध्यक्ष संजय बारबोले यांना दलित मित्र पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. तसेच, ज्येष्ठ पत्रकार अरुण बळप यांचाही या पुरस्काराने सन्मान होत आहे. 23 ऑगस्ट रोजी मान्यवरांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण होणार आहे. स्व.अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्ताने दरवर्षी दलितमित्र पुरस्काराचे आयोजन करण्यात येते.
समाजातील वंचित घटकांना न्याय देण्यासाठी सातत्याने ज्यांनी आपली लेखणी चालवली. बहुजन वंचित समाजातील पीडितांसाठी ज्यांनी शासन दरबारी आवाज उठवला, अशा पत्रकार मित्रांचा सन्मान करण्यात येतो. संजय बारबोले हे गेल्या 25 वर्षांपासून तालुक्यात पत्रकारितेतुन सर्वसामान्य जनतेचे प्रश्न मांडत आहेत. अठरा पगड, 12 बलुतेदार समाजाच्या पाठीशी ते उभे असतात, त्यात दलित मित्रांच्या चळवळीलाही ते जनसत्य मांडत पत्रकारितेतून बळ देतात. तसेच, अरुण बळप हेही तरुण भारतच्या माध्यमातून दलित मित्रांसाठी आवाज बनतात. त्यांच्या याच कार्याची दखल घेऊन दोन्ही पत्रकारांना दलित मित्र पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येत आहे.
दलित महासंघाच्यावतीने हा पुरस्कार प्रदान करण्यात येत आहे. 23 ऑगस्ट रोजी दुपारी 1 वाजता वाजता यशवंतराव चव्हाण सभागृह येथे हा पुरस्कार सोहळा मोठ्या दिमाखात संपन्न होइल. दरम्यान, पत्रकारीतेस विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांना हा पुरस्कार देण्यात येत आहे.



