टपाल विभागात ‘डाक जीवन विमा’ प्रतिनिधींची भरती; 20 जानेवारीला मुलाखती

0

B1न्यूज मराठी नेटवर्क

अमरावती : भारतीय डाक विभागाच्या अमरावती विभागांतर्गत डाक जीवन विमा विना मध्यस्थी नेमणूक करण्यात येणार आहे. या पदासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 20 जानेवारी 2026 रोजी सकाळी 11 ते दुपारी 3 या वेळेत मुलाखतीसाठी उपस्थित राहावे, असे आवाहन प्रवर अधीक्षक डाकघर, अमरावती विभाग यांनी केले आहे.

या भरतीसाठी उमेदवाराचे वय 18 ते 50 वर्षांच्या दरम्यान असणे आवश्यक असून, किमान शैक्षणिक पात्रता 10 वी उत्तीर्ण (किंवा समतुल्य) असणे अनिवार्य आहे. उमेदवारांची निवड ही मुलाखतीतील कामगिरी, संवाद कौशल्य, व्यक्तिमत्व आणि विमा क्षेत्रातील प्राथमिक ज्ञानावर आधारित केली जाईल. निवड झालेल्या उमेदवारांना ५ हजार रुपयांची सुरक्षा अनामत रक्कम (NSC किंवा KVP स्वरूपात) जमा करावी लागेल. प्रशिक्षणांनंतर उमेदवारांना सुरुवातीला तात्पुरता परवाना दिला जाईल. मात्र, नियुक्तीच्या तीन वर्षांच्या आत आयआरडीएची परवाना परीक्षा उत्तीर्ण करणे आवश्यक आहे, त्यानंतरच हा परवाना कायमस्वरूपी केला जाईल.

ही नियुक्ती पूर्णपणे कमिशन तत्त्वावर असेल. इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीच्या दिवशी आपले मूळ शैक्षणिक प्रमाणपत्रे, आधार कार्ड, पॅन कार्ड आणि पासपोर्ट आकाराचे फोटो घेऊन प्रवर अधीक्षक कार्यालय, कॅम्प, अमरावती – 444620 येथे प्रत्यक्ष उपस्थित राहावे. निवड प्रक्रियेबाबतचे अंतिम अधिकार भारतीय डाक विभागाने स्वतःकडे राखून ठेवले आहेत.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या