बार्शीमहाराष्ट्रशिबीर

बी.पी .सुलाखे कॉमर्स कॉलेज मध्ये विशेष गुणवत्ता वाढ विकास शिबिरांचे आयोजन

B1न्यूज मराठी नेटवर्क

बार्शी : येथील बी.पी सुलाखे कॉमर्स कॉलेज मध्ये इयत्ता बारावी कला व वाणिज्य विभागातील विद्यार्थ्यांसाठी दिनांक 18, 19 व 20 या तारखेला गुणवत्ता वाढ व विकास या विषयावर शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरामध्ये इयत्ता बारावी कला व वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांना त्यांना बारावीला असलेल्या सर्व विषयाचे, तज्ञ मार्गदर्शक शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

इयत्ता बारावी बोर्ड परीक्षा 2026 ला सामोरे जाताना पेपर कसे सोडवावेत, अभ्यास कसा करावा, अवघडातून सोप्याकडे कसे जावे. असे मार्गदर्शन प्राध्यापक श्री फडतरे सर, प्रा. अर्जुन सुतार सर, प्रा . डॉ.सुशांत काकडे सर प्रा.अंबादास पाटील सर ,प्रा. पोहोळकर सर , व प्रा. वडणे सर , या तज्ञ मार्गदर्शक शिक्षकांनी मार्गदर्शन केले. त्यामुळे विद्यार्थ्यांना गुणवत्ता वाढीसाठी त्यांचा नक्कीच उपयोग होईल.

वाढीसाठी महाविद्यालयाचे प्राचार्य, डॉ. एस .बी करंडे सर ,समन्वयक प्रा. काळे एच .डी , प्रा. पोहोळकर सर व कनिष्ठ महाविद्यालयातील सर्व शिक्षकांनी सहकार्य केले. या शिबिराला विद्यार्थ्यांचा प्रतिसाद मोठ्या प्रमाणात होता.5000

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button