नवी दिल्लीमहाराष्ट्र

सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाठ यांनी इंदू मिल येथे उभारण्यात येणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भव्य पुतळ्याच्या कामाची केली पाहणी

B1न्यूज मराठी नेटवर्क

नवी दिल्ली : राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाठ यांनी आज ज्येष्ठ मूर्तिकार पद्मभूषण पुरस्कार प्राप्त राम सुतार यांच्या गाझियाबाद येथील कार्यशाळेस भेट देऊन मुंबईतील इंदू मिल येथे उभारण्यात येत असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 350 फुट उंच भव्य पुतळ्याच्या कामाची पाहणी करून आढावा घेतला.

यावेळी सुप्रसिद्ध मूर्तिकार सुतार, त्यांचे पुत्र अनिल सुतार, सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव हर्षदीप कांबळे, उपस्थित होते. सामाजिक न्याय मंत्री शिरसाट यांनी पुतळ्याच्या कामाची गुणवत्ता, प्रगती, इत्यादींचा आढावा घेऊन सुतार आणि अधिकाऱ्यांशी चर्चा करून काही महत्वपूर्ण सूचना दिल्या. आज राम सुतार यांचा आज 100 वा वाढदिवस असून या औचित्यांनी शिरसाठ यांच्या उपस्थितीत साजरा केल्याने आनंद द्विगुणीत झाल्याची भावना सुतार यांनी यावेळी व्यक्त केल्या.

तत्पूर्वी महाराष्ट्र सदन येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त छत्रपती शिवाजी राजे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यासमयी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासही पुष्प अर्पण करून अभिवादन केले. यावेळी सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव हर्षदीप कांबळे, विशेष कार्य अधिकारी अभय देशमुख, महाराष्ट्र सदनाच्या व्यवस्थापक भावना मेश्राम उपस्थित होत्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button