कर्मवीर डॉ.मामासाहेब जगदाळे यांची जयंती कर्मवीर सार्वजनिक ग्रंथालयात उत्साहात साजरी

0

B1न्यूज मराठी नेटवर्क

बार्शी : शब्दाची ज्ञानगंगा अर्थात शिक्षणाची ज्ञानगंगा अंधार असलेल्या घराघरांपर्यंत पोचवून प्रकाशाचा ज्ञानदीप अनेकांच्या मना-मनात रुजविणारे प्रज्वलित करणारे कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे यांची ११९ वी जयंती कर्मवीर सार्वजनिक ग्रंथालयात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अत्यंत साध्या पध्दतीने पणं मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे विद्यमान अध्यक्ष डॉ. बी. वाय. यादव साहेब हे होते. तर प्रमुख पाहुणे प्रसिद्ध मानसोपचार तज्ञ डॉ. कृष्णा मस्तुद साहेब, माजी उपप्राचार्य प्रा. शशिकांत धोत्रे , वृक्षमित्र सुनिलजी फल्ले, अकाऊंट असोसिएशनचे अध्यक्ष उत्तमराव देशमुखे, सामाजिक कार्यकर्ते बप्पा सुतार आदी उपस्थित होते.
प्रमुख मान्यवरांच्या हस्ते प्रतिमेचे पुजन करण्यात आले.प्रमुख मान्यवरांचे यथोचित सत्कार ग्रंथालयाचे अध्यक्ष मा.जयकुमार (बापूसाहेब) शितोळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सभासद व बालवाचक हर्षद देशमुखे, आर्यन पोकळे, श्लोकमस्के, बाळासाहेब पोकळे, कनैय्या चवरे आदी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करणेसाठी सभासद वैभव जगताप, विवेक कदम यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार ग्रंथपाल विनोद गायकवाड यांनी मानले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या