धाराशिवमहाराष्ट्र

भारतीय टी-20 संघाचे उपकर्णधार तिलक वर्मा यांनी घेतले श्री तुळजाभवानी देवीचे दर्शन

B1न्यूज मराठी नेटवर्क500

तुळजापूर : भारतीय टी-20 क्रिकेट संघाचे उपकर्णधार तिलक वर्मा यांनी आज श्रीक्षेत्र तुळजापूर येथे येऊन कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी देवीचे मनोभावे दर्शन घेतले. त्यांच्या आगमनामुळे मंदिर परिसरात क्रिकेटप्रेमी आणि भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. भाविकांनी त्यांचे उत्स्फूर्त स्वागत करत शुभेच्छांचा वर्षाव केला.500यावेळी धाराशिवचे जिल्हाधिकारी तथा श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानचे अध्यक्ष कीर्ती किरण पुजार यांनी तिलक वर्मा यांचे स्वागत करून श्री तुळजाभवानी देवीची प्रतिमा आणि प्रसाद भेट देत त्यांचा सत्कार केला. तसेच त्यांच्या आगामी क्रिकेट कारकिर्दीसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.500या प्रसंगी विधानपरिषदेचे आमदार विक्रम काकडे, मंदिर संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी उपेंद्र तामोरे, तहसीलदार तथा व्यवस्थापक (प्रशासन) माया माने, मंदिर संस्थानचे अधिकारी, कर्मचारी, पुजारी बांधव तसेच मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते. तिलक वर्मा यांच्या श्री तुळजाभवानी दर्शनामुळे मंदिर परिसरात विशेष उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, अनेक क्रिकेटप्रेमींनी त्यांच्यासोबत छायाचित्रे काढत त्यांना आगामी स्पर्धांसाठी शुभेच्छा दिल्या.500

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button