महाराष्ट्रमुंबई

लोकसंख्येप्रमाणे नव्या अंगणवाड्यांना मंजुरी; मंत्री आदिती तटकरे यांचे निर्देश

B1न्यूज मराठी नेटवर्क

मुंबई : ज्या भागात लोकसंख्येच्या प्रमाणात अंगणवाडी केंद्रांची आवश्यकता आहे, त्या ठिकाणी नव्या अंगणवाड्या सुरू करण्याचे निर्देश महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिले आहेत. तसेच अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या नियुक्ती प्रक्रियेबाबतही तातडीने कार्यवाही करण्याचे आदेश त्यांनी दिले.

या बैठकीत विभागाच्या १५० दिवसांच्या कामाचा आढावा, अंगणवाडी पर्यवेक्षिकांच्या पदोन्नती, अहिल्याभवन उभारण्यासाठी जागा निश्चिती, तसेच बालसंगोपन योजनांच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यात आला.

बैठकीस महिला व बालविकास विभागाचे सचिव डॉ. अनुपकुमार यादव, आयुक्त कैलास पगारे, सहसचिव वि.रा. ठाकूर यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button