पत्रकार भूषण देवकर यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व खाऊ वाटप
B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : शिवकीर्ती न्यूज चे मुख्यसंपादक, गायक, संगीतकार, बार्शी चे कुमार सानू म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असणारे हरहुन्नरी गायक कलाकार भूषण देवकर यांचा वाढदिवस विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व खाऊ वाटप करून साजरा करण्यात आला.
वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळून, राष्ट्रपिता महात्मा गांधी नगरपालिका शाळा क्रमांक १९ मधील २३ विद्यार्थ्यांना वही, पेन, गुलाब पुष्प, व खाऊ वाटप करण्यात आले. याप्रसंगी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दरवळताना दिसून येत होता.
यावेळी उपस्थित शाळेतील शिक्षक अमोल नलवडे, सौ पूनम नरोटे तसेच रणसंघर्ष न्यूज चे संपादक परमेश्वर कदम, पुढारी वृत्तपत्राचे गणेश गोडसे, टी एम न्यूज चे संपादक श्रीशैल माळी, हिंदवी समाचार चे संपादक धीरज शेळके, माजी नगरसेवक संजय पोफळे, सामाजिक कार्यकर्ते महेश देशमुख, जगदीश भालेराव, डॉ. अशोक शिंदे,अश्वकुमार अहिरे, श्यामकुमार शर्मा, भैरवनाथ शिंदे, गणेश रजपूत, राणी घोगरे आदी मान्यवर उपस्थित होते.




