निवेदनबार्शीमहाराष्ट्र

बार्शी तालुक्यात शेतकऱ्यांच्या जीवाशी खेळणाऱ्या बिबट्याचा तात्काळ बंदोबस्त करा आणि शेतीसाठी दिवसा विजपुरवठा द्या – छावा संघटनेची मागणी

B1न्यूज मराठी नेटवर्क

बार्शी : गेल्या काही दिवसांपासून बार्शी तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये बिबट्याने अक्षरशः थैमान घातले आहे. उपळाई (ठों.), पानगाव, रुई, चारे आदी भागातील जाणवरांवर हल्ला करून, गाई, वासरे व शेळ्या फस्त केल्या आहेत. बिबट आणि त्याच्या पिल्लांचा वावर बार्शी तालुक्यात असल्याचे बार्शी वनविभागाने देखील जाहीर केले आहे. बिबट्याने जनावरांवर केलेल्या हल्ल्यामुळे अनेक जनावरे मृत्यूमुखी पडून शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. बिबट्याच्या हल्ल्यामुळे बार्शी तालुक्यातील शेतकरी आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बिबट्याचा तात्काळ बंदोबस्त करण्याची तालुक्यातील शेतकऱ्यांची व नागरिकांची जोरदार मागणी आहे.

तसेच ग्रामीण भागामध्ये शेतीसाठी रात्रीचा विजापूरवठा असल्यामुळे रात्री – अपरात्री अनेक संकटांना तोंड देत शेतकऱ्यांना शेतामध्ये ज्वारी, हरभरा, गहू तसेच कांदा या पिकाला पाणी देण्यासाठी शेतकरी जीव मुठीत घेऊन शेतामध्ये जात आहेत. शेतकऱ्यांना संकटातून वाचवण्यासाठी शासनाने शेतीसाठी दिवसा वीजपुरवठा द्यावा असे देखील शेतकऱ्यांमधून मोठी मागणी होत आहे.

तरी आपण वरील गोष्टींचा गांभीर्याने विचार करून, नागरिकांसाठी धोकादायक असणाऱ्या बिबट्याचा तात्काळ बंदोबस्त करावा व शेतीसाठी दिवसा वीज पुरवठा उपलब्ध करून द्यावा, अन्यथा शेतकऱ्यांच्या न्याय व हक्कासाठी तसेच शेतकऱ्यांच्या रक्षणासाठी छावा संघटना रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडेल अशा प्रकारचा इशारा छावा संघटनेचे बार्शी तालुकाध्यक्ष धीरज शेळके यांनी बार्शी तहसीलदार यांना निवेदनाद्वारे दिला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button