महाराष्ट्रसोलापूर

मागासवर्गीय मुलींनी शासकीय वसतिगृहात प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज करावे

B1न्यूज मराठी नेटवर्क

सोलापूर : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाअंतर्गत पंढरपुर जि.सोलापुर येथील कोर्टी रोड, संभाजीराजेनगर येथे मागासवर्गीय व आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय मुलीसाठी शासकीय वसतिगृहात प्रवेश घेण्यासाठी https://hams.mahati.org या संकेतस्थळावरुन अर्ज स्वीकारले जात आहेत.

या वसतिगृहात प्रवेशित विदयार्थीनीना निवास व्यवस्था, भोजन व्यवस्था शैक्षणिक साहित्य, निर्वाह भत्ता, खेळाचे साहित्य, संगणक कक्ष, सुरक्षेसाठी सी.सी. टिव्ही कॅमेरे, पिण्यासाठी शुध्द पाणी, 24 तास सुरक्षारक्षक इ. सोयीसुविधा मोफत पुरवल्या जातात. या वसतिगृहामध्ये शासन निर्णयानुसार अनुसुचित जाती, अनुसुचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग, इतर मागास प्रवर्ग, खुला, अपंग, अनाथ प्रवर्गनिहाय प्रवेश प्रक्रिया राबवीली जाते.

सन 2025-26 या शैक्षणिक वर्षाकरिता वसतिगृहातील रिक्त जागेवर इयत्ता आठवी पासुन ते उच्च / व्यवसायिक शिक्षणाच्या प्रथम वर्षासाठी प्रवेश घेतलेल्या विदयार्थीनीना वसतिगृहाच्या प्रवेश प्रकिया ऑनलाइन पध्दतीने विदयार्थ्याकडुन प्रवेश अर्ज भरुन घेण्यात येणार आहेत. अधिक माहितीसाठी वसतिगृहास भेट ‌द्यावी असे आवाहन गृहपाल मेटकरी एस. एस यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button