साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे शिष्यवृत्तीकरीता अर्ज आमंत्रित अंतिम मुदत 25 जूनपर्यंत

B1न्यूज मराठी नेटवर्क
चंद्रपूर : सन 2024-25 या शैक्षणिक वर्षात इ. 10 वी, 12 वी, पदवी, पदव्युत्तर, वैद्यकीय व अभियांत्रिकी इ. अभ्यासक्रमांमध्ये सरासरी 60 टक्के किंवा त्यापेक्षा जास्त टक्केवारीने गुण प्राप्त करून उत्तीर्ण झालेल्या मातंग समाज व तत्सम 12 पोटजातीतील विद्यार्थ्यांकडून साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे शिष्यवृत्तीकरीता अर्ज मागविण्यात येत आहे.
मांग, मातंग, मिनिमादीग, मादींग, दानखनीमांग, मांगमहाशी, मदारी, राधेमांग, मांगगारूडी, मांगगारोडी. मादगी, मादीगा या जातीतील विद्यार्थी – विद्यार्थींना महामंडळाकडुन जेष्ठता व गुण क्रमांकानुसार जिल्ह्यातील पहिले तीन किंवा पाच विद्यार्थ्यांस उपलब्ध निधीच्या अधिन राहून साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळातुन शिष्यवृत्ती मंजुर करण्यात येते. संबंधितांनी 25 जून 2025 च्या आत सर्व कागदपत्रानिशी जिल्हा कार्यलयात संपर्क करून खालील प्रमाणे मुळ कागदपत्रे दोन प्रतीत आणावीत
जातीचा दाखला, 2. फोटो, 3. मार्कशीट, शाळा सोडल्याचा दाखला, 4. राशनकार्ड, 5. उत्पन्नाचा दाखला, 6. आधारकार्ड, 7. बैंक पासबुक, 8. पुढच्या वर्गात प्रवेश घेतल्याची पावती किंवा बोनाफाईड सर्टिफिकेट व 9. जिल्हा व्यवस्थापकांच्या नावे शिष्यवृत्ती मागणीचा अर्ज इ. कागदपत्रांसह साहित्यरत्न लोकशाहिर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ,डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे द्यावा तसेच याबाबत कार्यालयात संपर्क साधावा