उद्घाटनमहाराष्ट्रयवतमाळ

जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते कॅन्सर डायग्नोसीस व्हॅनचे उद्घाटन , मुख, स्तन व गर्भाशयमुख कर्करोगाची विशेष तपासणी मोहिम

B1न्यूज मराठी नेटवर्क

यवतमाळ : राष्ट्रीय असंसर्गजन्यरोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत मुख स्तन व गर्भाशयमुख कर्करोग विशेष तपासणी मोहिम राबविण्यात येत आहे. मोहिमेंतर्गत या तीन कर्करोगासंबंधीत आढळून आलेल्या संशयित रुग्णांवर मोफत निदान व उपचार करण्याकरीता जिल्ह्यात कॅन्सर व्हॅनचे आगमन आले असून या व्हॅनचे उद्घाटन जिल्हाधिकारी विकास मीना यांच्या हस्ते झाले.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात उद्घाटनप्रसंगी जिल्हाधिकाऱ्यांसह मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुखदेव राठोड, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. क्रांतीकुमार नावंदीकर, कॅन्सर तज्ञ डॉ.आशुतोष गावंडे, डॉ. मधुकर मडावी, डॉ.अमोल गिरी आदी उपस्थित होते.

राष्ट्रीय असंसर्गजन्यरोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत उच्चरक्तदाब, मधुमेह, मुख कर्करोग, स्तन कर्करोग, गर्भाशयमुख वर्करोग, स्ट्रोक, हृदयरोग इत्यादी आजारांचे सर्व आरोग्य संस्थामध्ये तपासणी, उपचार व निदान केल्या जाते. सदर कार्यक्रम सर्व आरोग्य संस्थांमध्ये राबविण्यात येत आहे.

जागतिक कर्करोग दिनानिमित्ताने जिल्ह्यात दिनांक ४ फेब्रुवारी‌ ते ३० जून या दरम्यान सर्व उपजिल्हा, ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र, नागरी आरोग्य केंद्र, नागरी आरोग्य उपकेंद्र, आपला दवाखाना या ठिकाणी मुख कर्करोग, स्तन कर्करोग व गर्भाशयमुख कर्करोग या तीन कर्करोगासंबंधी विशेष तपासणी मोहिम राबविण्यात येत आहे. मोहिमेंतर्गत या तीन कर्करोगासंबंधी आढळून आलेल्या संशयित रुग्णांवर मोफत निदान व उपचार कॅन्सर व्हॅनद्वारे करण्यात येणार आहे.

या कॅन्सर डायग्नोसीम व्हॅनमध्ये विशेष तपासणी दरम्यान आढळून येणा-या तीन कर्करोगासंबंधी संशयित रुग्णांची बायोप्सी करण्यात येणार आहे. आज या व्हॅनचे उद्घाटन करण्यात आले. कॅन्सर व्हॅन जिल्ह्यातील सर्व उपजिल्हा व ग्रामीण रुग्णालय तमेच प्राथमिक आरोग्य केंद्र येथे महिनाभर फिरणार आहे. संशयित लक्षणे असलेल्या मुख कर्करोग, स्तन कर्करोग, गर्भाशयमुख कर्करोगाच्या रुग्णांनी तपासणी व्हॅनचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button