महाबळेश्वर येथील गहू गेरवा संशोधन केंद्राच्या अतिथीगृहाचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्याहस्ते भूमिपूजन

0

B1न्यूज मराठी नेटवर्क

सातारा : महाबळेश्वर येथील विभागीय गहू गेरवा संशोधन केंद्रामध्ये गव्हाच्या रोगावर संशोधन सुरु असून आता स्ट्रॉबेरी संदर्भात संशोधनास मान्यता मिळाली आहे. त्याचे देखील काम सुरु आहे. लवकरात लवकर केंद्र अद्ययावत करून शेतकऱ्यांना अधिकाधिक सुविधा देण्यासाठी राज्यशासन प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी केले.

कृषिमंत्री तथा महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरीचे प्रति कुलपती माणिकराव कोकाटे हे महाबळेश्वर येथील वेण्णालेक नजीक महात्मा फुले कृषी विद्यापीठ,राहुरी यांच्या विभागीय गहू गेरवा संशोधन केंद्राच्या नव्याने उभारण्यात येत असलेल्या इमारत अतिथीगृह भूमिपूजन प्रसंगी बोलत होते.

कोकाटे म्हणाले , महाबळेश्वर येथे संशोधनासाठी येणारे शास्त्रज्ञ, परदेशी पाहुणे व शेतकरी याना राहण्यासाठी उपयोगी होईल. माणिकराव कोकाटे यांनी सध्याच्या जुन्या अतिथिगृहाची पाहणी केली. त्यानंतर नव्याने उभारण्यात येणाऱ्या इमारतीची जागा व आराखडा पहिला. यातील बारकावे समजून घेत अभियंत्यांना काही बदल कारण्यासह महाबलेश्वर पर्यटन स्थळास शोभेल असे दर्जेदार काम करण्याबाबत सूचना दिल्या.

यावेळी महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद पुणेचे उपाध्यक्ष तुषार पवार, विद्यापीठ अभियंता डॉ. मिलिंद ढोके गहू गेरवा कवक शास्त्रज्ञ डॉ. दर्शन कदम, गहू रोग शास्त्रज्ञ डॉ. मनीष सुशीर, वनस्पती रोग शास्त्रज्ञ डॉ. विक्रांत साळी, जिल्हा कृषी अधिकारी भाग्यश्री फरांदे यांच्यासह गहू गेरवा संशोधन केंद्रातील कर्मचारी,कृषी विज्ञान केंद्र बोरगाव येथील अधिकारी कर्मचाऱ्यासह मान्यवर उपस्थित होते.

महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी यांच्या विभागीय गहू गेरवा संशोधन केंद्राच्या माध्यमातून उभारण्यात येणारे हे अतिथीगृह भारतीय कृषी अनुसंधान नवी दिल्ली येथील शास्त्रज्ञ, आंतरराष्ट्रीय मका आणि गहू सुधारणा केंद्र (CIMMYT) मेक्सिको येथील गहू तांबेरा शास्त्रज्ञ रोगावर काम करणारे शास्त्रज्ञ व शेतकरी यांच्यासाठी उपयोगी येणार असल्याचे गहू गेरवा कवक शास्त्रज्ञ डॉ दर्शन कदम यांनी सांगितले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या