क्रीडा संकुलातील बॅडमिंटन कोर्ट नुतनीकरण कामाचे उद्घाटन

0

B1न्यूज मराठी नेटवर्क

यवतमाळ : जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात बसविण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अर्धकृती पुतळ्याचे अनावरण व कार्यालय इमारतीचे प्रवेशद्वार तसेच बॅडमिंटन कोर्ट नुतनीकरण कामाचे उद्घाटन आ.बाळासाहेब मांगूळकर व जिल्हाधिकारी विकास मीना यांच्या हस्ते झाले.

कार्यक्रमाला आ.बाळासाहेब मांगुळकर, जिल्हाधिकारी विकास मीना यांच्यासह दादोजी कोंडदेव, शिवछत्रपती पुरस्कारार्थी डॉ.उल्हास नंदुरकर, कार्यकारी अभियंता विक्रांत शिरभाते, जिल्हा क्रीडा अधिकारी घनश्याम राठोड, उपस्थित होते. शिवराज्यभिषेक सोहळ्याचे औचित्य साधून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

क्रीडा सुविधा वेळोवेळी प्रचलित मानकाप्रमाणे अद्यावत व सुशोभित कराव्या लागतात. त्या अनुषंगाने शासनाच्या विविध योजनांमधून क्रीडा विषयक सुविधा निर्माण करणे तसेच अद्यावत, नुतनीकरण करणे गरजेचे असते. त्यानुसार शिवराज्यभिषेक सोहळ्याचे औचित्य साधुन जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय येथील कार्यालयीन इमारतीच्या प्रवेशद्वाराचे उद्घाटन करण्यात आले. तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अर्धकृती पुतळ्याचे अनावरण, तसेच बॅडमिंटन कोर्ट नुतनीकरण काम, बिलीयर्डस टेबल हॉलचे उद्घाटन करण्यात आले.

तसेच जिल्ह्यातील सर्व तालुक्यात खेळांचा प्रचार, प्रसार व आयोजन करणाऱ्या क्रीडा क्षेत्रात मोलाचे सहकार्य करणाऱ्यांचा क्रीडादुत, क्रीडा कार्यकर्ता म्हणुन गौरव करण्यात आला. जिल्हा क्रीडा कार्यालयाद्वारे तयार करण्यात आलेल्या क्रीडा सुविधा विषयक पुस्तिकेचे विमोचन देखील करण्यात आले.

कार्यक्रमच्या यशस्वीतेसाठी क्रीडा अधिकारी महेश पडोळे, चैताली लोखंडे, सचिन हरणे, क्रीडा मार्गदर्शक मंगेश गुडधे तसेच क्रीडा शिक्षण जितेंद्र सातपुते, रविंद्र पाळेकर, मनिष डोळसकर, अभय धोबे, खुशाल भगत, पांडुरंग जाधव, गिरीराज गुप्ता, दिनेश ब्राम्हणवाडे यांनी सहकार्य केले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या